अहमदनगर : अहमदनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर गोळीबार करुन प्रेमवीराने आत्महत्या केल्याची घटना घडली. अमृतलाल पाल असं गोळी झाडून आत्महत्या केलेल्या प्रेमवीराचं नाव आहे. शनिवारी सकाळी विळद घाटात पाण्याच्या टाकीजवळ ही दुर्घटना घडली.
अमृतलालचं विवाहित महिलेवर अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम होतं. संबंधित महिला उत्तरप्रदेशातील असून पतीसोबत ती विळदला राहते. महिलेचा पती एमआयडीसीत काम करतो.
अमृतलाल शनिवारी सकाळी महिलेला भेटण्यासाठी विळदला आला होता. संबंधित महिलेला त्यानं पाण्याच्या टाकीजवळ बोलावलं. मात्र महिलेनं भेटण्यास नकार दिल्याने त्याने महिलेच्या घराजवळ गोळीबार केला.
गोळी महिलेच्या पोटाला घासून गेल्यानं महिला सुदैवाने थोडक्यात बचावली. महिलेवरील गोळीबारानंतर अमृतलालनं स्वतः च्या छातीवर गोळी झाडली. गंभीर दुखापत झाल्याने अमृतलालचा मृत्यू झाला, तर महिलेची तब्येत स्थीर असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.
नगरमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेवर गोळीबार करुन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2017 02:57 PM (IST)
अमृतलालचं विवाहित महिलेवर अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम होतं. संबंधित महिला उत्तरप्रदेशातील असून पतीसोबत ती विळदला राहते. महिलेचा पती एमआयडीसीत काम करतो.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -