Sugar Price Hike In Maharashtra: सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी (Sugar Price Hike) घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ झाली आहे. 

Continues below advertisement

साखर 7 हजार 500 प्रति क्विंटलवर गेली आहे. तर वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे.

हिंगोलीत साखरेचे दर तब्बल 75 रुपये- (Sugar Price Hike In Hingoli)

हिंगोलीत साखरेचे दर तब्बल 75 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत. साखरेच्या दरात झालेली ही मोठी वाढ आता थेट मिठाई व्यवसायाच्या गणितावर परिणाम करू लागली आहे. कारण मिठाई तयार करण्यासाठी साखर हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा घटक आहे. त्यामुळे साखर महागली आणि मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. याचा परिणाम मिठाईच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साखरेचे किती दर? (Sugar Price Hike In Maharashtra)

मिठाईचे दर वाढणार- (Sweets prices marathi News)

हिंगोली शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच विविध प्रकारच्या मिठाई तयार करण्याची लगबग पाहायला मिळते. पेढे, बर्फी, गुलाबजामुन, जिलेबी, लाडू अशा अनेक मिठाई तयार करताना मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जातो. मात्र, साखरेचे दर वाढल्याने आता मिठाई विक्रेत्यांच्या खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. पूर्वी ज्या प्रमाणात साखरेसाठी खर्च होत होता, त्यापेक्षा आता त्याच उत्पादनासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम केवळ मिठाई विक्रेत्यांवरच नाही, तर ग्राहकांच्या खिशावरही होण्याची शक्यता आहे. कारण उत्पादन खर्च वाढल्यास मिठाईचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: