Harshawardhan Patil:राज्यभरातील साखर कारखाने अडचणीत असून एफआरपी आणि एमएसपी एकाचवेळी जाहीर करायला हवेत असे सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यातील 180 साखर कारखाने बंद झाले असून गळीत हंगाम बंद होण्याच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात 17-17.5 टक्के साखर उत्पादन कमी झालं आहे. निवडणूकांचाही साखर उत्पादनावर परिणाम झाल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. येत्या दोन वर्षात साखरेचं उत्पादन कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sugarcane Factories)

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

राज्यातील 180 साखर कारखाना बंद झाले आहेत.गतवर्षी त्यांची संख्या 103 होती.निवडणुका,अनियमित हवामान, लहरी पाऊस, अकाली आलेला फुलोरा आणि रोगराई चा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात 25 ते 30  टक्क्याने घट झाला झाला आहे. एफआरपी आणि एम एस पी एकावेळी जाहीर करायला हवे. असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही साखरेची दर फार वाढलेले आहेत. साखर कारखाने गाळप दिवस कमी होत चालले आहेत यावेळी 80दिवस फक्त कारखाने चालले, इतर वेळी कारखाना बंद असले परवडत नाही.14 दिवसात एफआरपी द्यावी असा कायदाच आहे,चर्चा नुसार आता दोन टप्प्यात दिले जाते,कायदाप्रमाणें करावे .

निवडणूकींचाही कळत नकळत परिणाम: हर्षवर्धन पाटील

यावर्षी आणि पुढच्या वर्षी साखर कमी आहे.केंद्र सरकारकडे दिवसाच्या दराचे नियंत्रण असतं.किती साखर रिलीज करायचे हा निर्णय केंद्र सरकारकडे आहे.14 दिवसात एफआरपी द्यावी असा कायदाच आहे,चर्चा नुसार आता दोन टप्प्यात दिले जाते,कायदाप्रमाणें करावे .कारखाना सुरू होण्यास विलंब निवडणुकीमुळे झाला त्याचा ही कळत न कळत परिणाम उत्पादनावर झाला आहे. साखर टंचाई वर पर्याय म्हणून बैठक घेण्यासाठी सागितले आहे,या अगोदर एकदा अशी परस्थिती झाली आहे,पुढचा सिझन वेळेत कसा सुरू करता येईल,आपण साखर इम्पोर्ट करू शकत नाही,हे सगळ महागात पडेल.2 टक्के रिकव्हरी लॉस्ट सरकारने सहन करावा.

ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग ऊस उत्पादनात कसा करता येईल,येणाऱ्या पाच वर्षात शेतकऱ्यांनी ए आय माध्यमांतून शेती करावी,खर्च कमी होतो आहे,पाणी बचत होत आहे, मनुषबळ कमी लागत आहे,ऊस उत्पादन जास्त होतो. नवीन प्लांट आणि मशनरी अनेक बदल झाले आहेत, कमीत कमी 10 हजार हार्वेस्टर शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना द्यावे लागतील, ऊस तोड मोठी समस्या आहे. असेही ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावेत का?एकच पक्ष होता त्याचे दोन झाले,अनेकजणांना वाटत एक झाले पाहिजे,दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना विचारायला हवेत प्रश्न मला विचारण्यापेक्षा असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हेही वाचा:

Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले...