काही मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या बंगल्यांचा ताबा घेतला असला तरी महायुतीच्या काही मंत्र्यांनी (2014) त्यांचे बंगले रिकामे केलेले नव्हते. या नेत्यांना गेल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले सोडण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यापैकी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप बंगले रिकामे केलेले नाहीत.
सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या आठवड्यात बंगले सोडण्याबाबत नोटीस पाठवलेले नेते
1. सुधीर मुनगंटीवार
2. जयदत्त क्षीरसागर
3. दीपक केसरकर
4. रामदास कदम
5. मदन येरावर
6. अविनाश महातेकर
7. सुभाष देशमुख
8. सुरेश खाडे
9. अर्जुन खोतकर
कुठल्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला
कॅबिनेट मंत्री
1. अजित पवार - देवगिरी
2. दिलीप वळसे पाटील - शिवगिरी
3. अशोक चव्हाण - मेघदूत
4. अनिल देशमुख - ज्ञानेश्वरी
5. आदित्य ठाकरे - अ 6
6. धनंजय मुंडे - अ 9
7. विजय वडेट्टीवार - अ 3
8. वर्षा गायकवाड - ब ४
9. जितेंद्र आव्हाड - ब 1
10. हसन मुश्रीफ - ब 5
11. अनिल परब - क 5
12. सुनील केदार - ब 7
13. अमित देशमुख - अ 4
14. नवाब मलिक - अ 5
15. उदय सामंत - ब 2
16. दादाजी भुसे - ब 3
17. संजय राठोड - क 1
18. गुलाबराव पाटील - क 8
19. के. सी पाडवी - क 3
20. संदीपान भुमरे - क 4
21. बाळासाहेब पाटील - क 6
22. अस्लम शेख - क 2
23. यशोमती ठाकूर - ब 6
24. शंकरराव गडाख - सुरुची 16
राज्यमंत्री
1. बच्चू कडू - रॉकीहील टॉवर 1202
2. संजय बनसोडे - रॉकीहील टॉवर 1203
3. शंभुराज देसाई - यशोधन 12
4. अब्दुल सत्तार - सुरुची 15
5. सतेज पाटील - सुरुची 3
6. राजेंद्र यड्रावकर पाटील - सुरुची 2
7. दत्तात्रय भरणे - अवंती 1
8. आदिती तटकरे - सुनिती 10
9. विश्वजीत कदम - निलांबरी 302
10. प्राजक्त तनपुरे - निलांबरी 402
मंत्रिमंडळातील कुठल्या नेत्यांना कुठला बंगला? | ABP Majha