मुंबईः एमपीएससीची परीक्षा पास होऊनही शासकीय सेवेत सामावून न घेतलेल्या 65 उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात साखळी उपोषण सुरु केलं आहे. परीक्षेत यश मिळवूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे या तरुणांना रस्त्यावर उतरावं लागलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2 वर्षांपूर्वी 87 उमेदवारांची अधिव्याख्याता इंग्रजी आणि शासकीय तंत्रनिकेतन शिक्षक पदांवर निवड झाली होती.
यापैकी 22 जणांना नियुक्ती देण्यात आली. तर उरलेले अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निवड होऊन 2 वर्ष उलटल्याने या उमेदवारांचं मोठं नुकसान होतं आहे. ते भरुन मिळावं आणि लवकरात लवकर सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी हे उपोषण केलं जातं आहे.