Mumbai Vasai Virar Crime :  बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur Minor Abuse Case) झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केलीय. दरम्यान, या घटनेनंतर राज्यात सातत्याने असे अनेक प्रकार उजेडात येऊ लागले आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय. अशातच वसईतून (Vasai-Virar) आशीच एक संताप जनक आणि मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. 


चिमूकल्याच्या गुप्तांगावर दिले गरम चाकूने चटके


वसईतील एका सावत्र आईनेच दोन लाहानग्यावर घरात अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. यात घरातील भांडी घासणे, फरशी पुसणे, झाडू मारणे यासाठी सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलावर लोखंडी पकडीने, पोळी लाटण्याच्या लाटण्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिल्याचा प्रकार देखील घडला आहे. ही घटना वडिलांना कळल्यावर वडीलांनीच सावत्र आई विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळेपाठोपाठ रहात्या घरात ही अल्पवयीन मुलं असुरक्षित असल्याचे वसईच्या वालीव येथील घटनेवरून समोरं आले आहे.


खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके


वसईच्या अत्याचार प्रकरणाप्रमाणेच भिवंडीत देखील असाच एक प्रकार उजेडात आला आहे. यात एका खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके दिल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आलाय. खासगी बालिका आश्रमात चिमुरडीला चटके देऊन छळाचा प्रकार उघडकीस आलाय.  शोभा आश्रम असे खाजगी बालिका आश्रमचे नाव आहे. पीडीतेच्या आजीच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


आश्रम संचालकास अटक


शिवाय आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे यास अटक करण्यात आली आहे. ही घटना 23 मे ते 15 जुलै 2024 दरम्यान धामणकर नाका परिसरात घडली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 118(1) , बालन्याय (मुलांच्या काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संदर्भात अधिक तपास भोईवाडा पोलीस करीत आहे.


मुंबईत अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार


बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुंबईत  बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक झाली आहे.  
 
इतर महत्वाच्या बातम्या