आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जातेय. निवडणुकीला पूरक ठरतील असे बदल मंत्रिमंडळात केले जातील. भाजपच्या दोन ते तीन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळतेय.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांचा मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा घेण्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची परवानगी असल्यास पुन्हा शपथ देऊन मंत्री पद दिले जाईल.
शिवसेनेचा कोटा संपला असला, तरी अधिकची दोन मंत्री पद देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, दसरा मेळाव्यानंतर विस्तार करण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी आहे.
त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच लागली आहे.