मुंबई : राज्यासह देशभरातील टोल नाके आज मध्यरात्रीपासू सुरु होणार आहेत. टोलमुक्तीमुळे कंत्राटदारांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, पैसे देण्याऐवजी टोलवसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. टोलमुक्तीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यभरासह देशभरातील राष्ट्रीय महमार्गांवर पुन्हा टोल भरावा लागणार आहे.

टोलमाफीचा शेवटचा दिवस, मध्यरात्रीपासून पुन्हा टोलवसुली

  नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील 65 टोल नाक्यांवर वसुली बंद होती. राज्यात दिवसाला साडे सहा कोटी रुपयांची टोलवसुली होते. परंतु तीन आठवडे टोलवसुली बंद असल्याने कंत्राटदारांना 125 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली केली. पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोलवसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करणार आहे. मात्र ही वसुली सर्वसामान्यांच्या खिशातूनच होण्याची शक्यता आहे.

टोल नाक्यांवर आता 5 ते 100 रुपयांपर्यंतची कुपन्स

  राज्यातील 65 टोल नाक्यांपैकी 53 टोलनाक्यावर लहान वाहनं वगळता जड आणि मोठ्या वाहनांकडून वसुली केली जाते. पण मुंबई एन्ट्री पॉईंट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह 12 टोलनाक्यांवर सर्वच वाहनांकडून टोल घेतला जातो.