Buldhana News : राज्य परिवहन मंडळाच्या परतवाडा आगारातूनपुण्यासाठीनिघालेल्या धावत्या बसमध्ये बस चालक चक्क ऑन ड्युटी मद्यप्राशनकरतअसल्याचाधक्कादायकप्रकारसमोरआलाआहे. इतकंचनव्हेतरयामद्यधुंद बस चालकाने खामगाव बस स्थानकात (Khamgaon Bus Depot) धिंगाणाघालत राडा घातलाआहे. सोबतच परतवाडा-पुणे (Parthwada-Pune bus) या बसमधील प्रवाशांना दोन तास वेठीस धरलं आहे. दरम्यानहासंपूर्णप्रकार एबीपी माझालाकळताच या प्रकरणी जाब विचारण्यातआला. त्यांनतर हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे प्रवाशांनी एबीपी माझाचेही आभार मानले आहेत. मात्रआता ऑन ड्युटी मद्यप्राशनकरून प्रवाश्यांचाजीवधोक्यातघालणाऱ्याबसचाकावरनेमकीकोणतीकारवाईकेलीजाते, हेपाहणंमहत्वाचेठरणारआहे.
Khamgaon Bus News : धावत्या बसमध्ये मद्यपान, माद्याच्या अनेक बॉटल्सही आढळल्या
राज्य परिवहन मंडळाची परतवाड्याहून पुण्याला निघालेल्या परतवाडा आगाराच्या शयनयान बस मधील चालक हा चक्कमद्यप्राशन करून बस चालवत असल्याचाप्रकारसमोरआलाय. यानंतर धावत्या बसमधील प्रवाशांनी 'एबीपी माझा'ला यासंदर्भातमाहिती दिली त्यावेळी बस ही खामगाव बस स्थानकात पोहोचली होती. ही बस परतवाडा येथून पुण्याला निघाली होती. त्यावेळी परतवाडा आगारातीलच दोन बस चालक व दोन वाहक या बस मध्ये होते. यातील बस चालवणारा चालक व सहचालक हे दोघेही धावत्या बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत मद्यपान करत होते. या बसमध्ये माद्याच्या अनेक बॉटल्सही आढळल्या.
Khamgaon News : मद्यधुंद चालकांचा एबीपी माझाच्या कॅमेरामॅनवरहल्लाकरण्याचाप्रयत्न
दरम्यान, चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, तर जालन्याहून दुसरा चालक ही बस पुण्यापर्यंत चालवणार होता. तोही मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये होता. तर दारूच्या बॉटल देखील बसमध्ये आढळून आल्यात. यावेळी या दोन्ही बस चालकांनी खामगाव बस स्थानकावर मोठा राडा घातला. यावेळी पोलिसांना ही पाचारण करण्यात आलं आणि त्यामुळे बस ही दोन तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली. यामुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. एबीपी माझा ने याप्रकरणी जाब विचारल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. परिणामी प्रवाशांनी एबीपी माझाचेही आभार मानले. यावेळी वृत्तांकन करत असताना एबीपी माझाच्या कॅमेरामॅन शांताराम तायडे यांच्यावर या मद्यधुंद चालकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
