बीड : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल 13 जून रोजी दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागामध्ये बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 92.65 टक्के इतका घवघवीत निकाल लागला असून पुन्हा एकदा बीड जिल्ह्याने औरंगाबाद विभागातून बाजी मारली आहे.


बीड जिल्ह्यातील 42 हजार 443 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. या पैकी 39 हजार 324 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले.

बीड जिल्ह्याचा निकाल औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. विभागात जालना जिल्हा दुसर्‍या स्थानावर असून या जिल्ह्याचा निकाल 89.90 टक्के इतका लागला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याचा 89.56, हिंगोली 80.93 आणि परभणी जिल्ह्याचा निकाल 80.89 टक्के लागला आहे.

बीड जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल :

  • बीड – 94.66 टक्के

  • पाटोदा – 94.32 टक्के

  • आष्टी- 94.11 टक्के

  • गेवराई – 91.23 टक्के

  • माजलगाव – 89.20 टक्के

  • अंबाजोगाई – 90.99 टक्के

  • केज -93.12 टक्के

  • परळी – 90.75 टक्के

  • धारूर- 93.84 टक्के

  • वडवणी – 93.98 टक्के

  • शिरूर कासार – 92.98 टक्के