अमरावती : मेळघाटातील हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दबंग लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या दिपाली चव्हाण यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर 25 मार्च रोजी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पानांचं सुसाईड नोट लिहलं ज्यामध्ये त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं होतं सोबतच अपर प्रधान मुख्य सरंक्षक व क्षेत्र संचालक यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी देखील दखल घेतली नसल्याचं उल्लेख आहे.
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटत असतांना महाराष्ट्र राज्य वनाधिकारी संगठना यांनी मंत्रालय, यवतमाळ, नाशिक व जळगाव सह विविध जिल्ह्यात रेड्डी यांच निलंबन करून सहआरोपी करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज भाजपने तर अप्पर प्रधान मुख्य सरंक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन देत रेड्डीवर कारवाई करण्याची मागणी केली. दुपारी 2 च्या सुमारास अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि श्रीनिवास रेड्डी यांच निलंबन केल्याचं त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कळवलं. अजून निलंबनाची ऑर्डर निघाली नसून लवकरच ऑर्डर निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनाक्रम
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान हरीसाल येथील त्यांच्या शासकीय बंगल्यात आपल्या बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईड नोट लिहली. ज्यामध्ये DFO विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट लिहलं होतं. सोबतच ज्या अधिकाऱ्याला त्यांनी पत्र लिहलं त्यांचं नाव सुद्धा त्यात होतं. 26 मार्चला सकाळी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयातील शव विच्छेदना समोर दिपाली चव्हाण यांच्या कुटुंबांनी आणि बेलदार समाजानी वरिष्ठांना अटक होत नाही तोवर दिपाली चव्हाणचा शव घेणार नसल्याची भूमिका घेतली यावेळी भाजपने सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू केले होते.. यावेळी पोलिसांनी लगेच DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पळून जात असताना नागपूर रेल्वे स्थानकारून अटक केली. पण शिवकुमार याची वारंवार तक्रार करूनही तक्रारची दखल न घेणारे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक व क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली. RFO संघटनेनी श्रीनिवास रेड्डी वर सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली तर वनरक्षक-वनपाल संघटना सुध्दा आक्रमक झाली होती.. मात्र, पोलिसांनी योग्य तपास करूनच रेड्डीवर गुन्हा दाखल केला जाईल असं स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ आणि विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मुख्यमंत्री यांच्याकडे श्रीनिवास रेड्डीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली
यादरम्यान 28 मार्च रोजी हरीसाल येथील दिपाली चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानासमोर वनरक्षक-वनपाल संघटना, पर्यावरण प्रेमी, वन्यजीव प्रेमी, सेवानिवृत्त वनसैनिक, आणि गावकऱ्यांनी विशाल प्रतिकात्मक होळीच आयोजन केलं. यावेळी दोषी अधिकारी शिवकुमार आणि रेड्डी यांचे पोस्टर लावून त्यावर चपलांचा हार टाकून प्रतिकात्मक होळी जाळली. श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाढत असल्याने दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी महिला पोलीस उपअधीक्षक पूनम पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आणि शिवकुमार सोबतच रेड्डीवर सुद्धा कारवाई होणार असं सांगितलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यापण चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. श्रीनिवास रेड्डीना वारंवार सांगितले की दिपाली चव्हाण यांची बदली करा त्यांना शिवकुमार हे खूप त्रास देताय पण रेड्डी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी सांगितले त्याच वेळी रेड्डी यांच्या बचावासाठी रेड्डी यांच्या कार्यालयातील काही महिला-पुरुष कर्मचारी निवेदन घेऊन नवनीत राणा यांच्या घरी गेले तेव्हा नवनीत राणा त्यांच्यावर चांगल्याच भडकल्या तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना दिपाली चव्हाण यांची बदलीच शिफारस पत्र दिल्याचं सांगितले मात्र, त्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचं त्यांनी सांगितले.
तर अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात भाजपन चांगलंच आंदोलन करत ठिय्या आंदोलन केलं. श्रीनिवास रेड्डी यांच निलंबन करून त्यांना दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी यावेळी केली. दिपाली चव्हाण आत्महत्या झाल्यावर DFO शिवकुमार यांना अटक झाल्यावर त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती आज त्यांना धारणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालय कोठडी सुनावली आहे.. सोबतच शिवकुमार याला निलंबित केलं तर श्रीनिवास रेड्डी यांची नागपूरला तात्पुरती बदली केली गेली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha Exclusive : आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र
आत्महत्या करण्यापूर्वी सिंघम लेडी दीपाली चव्हाण यांनी आपल्या तक्रार अर्जात काय लिहलं होतं?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या