मोहोळमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक! उमेश पाटलांसह बंधू संतोष पाटलांचा पराभव, राजन पाटलांची खेळी यशस्वी
मोहोळ तालुक्यातील कुरुल गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील निवडणूक लढवत होते. त्यांचा पराभव झाला आहे.
Solapur Zilla Parishad election results 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटाची मोठी चर्चा झाली होती. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील निवडणूक लढवत होते. त्यांचा कुरुल गटातून पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी त्यांचा पराभव केला आहो. तसेच उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचाही नरखेड गटातून पराभव झाला आहे. यानंतर बंधू मोहोळ तालुक्यात भाजपला मिळालेल्या यशाचा जोरदार जल्लोष
भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष
मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांचा कुरुल जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे. भाजपच्या सचिन जाधव यांनी त्यांचा पराभव केला आहे. तसेच उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत होते. त्यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला, माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
वायफळ बोलणाऱ्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली, यशवंत मानेंची उमेश पाटलांवर टीका
माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृतुवात मोहोळ तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपला मिळालेल्या यशानंतर माजी आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वायफळ बोलणाऱ्या लोकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिल्याची टीका यशवंत माने यांनी उमेश पाटील यांच्यावर केली.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील यांनी ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं मोहोळ तालुक्यातील कुरुल आणि नरखेड गटाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. कुरुल गटातून उमेश पाटील निवडणूक लढवत होते. तर नरखेड गटातून त्यांचे बंधू संतोष पाटील निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत दोन्ही भावांचा पराभव झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात रान पाटील यांची खेळी यशस्वी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:

























