सोलापूर : भली मोठी पंगत, स्वयंपाकाची लगबग, भाविकांची गर्दी... एवढं कमी म्हणून की काय सोबतीला भजन आणि कीर्तन... हा भक्तीभावाचा सोहळा आहे सोलापूर जिल्ह्यातील


या सोहळ्याचं कारण म्हणजे या गावातील बिरोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दगडामधून प्रत्यक्ष देवाची मूर्ती अवतरली, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि त्या आनंदात हा सोहळा रंगला आहे.

बिरलिंगेश्वर किंवा बिरोबा हे बोरेगावचं ग्रामदैवत. पूर्वी एका दगडाला शेंदूर फासलेल्या अवस्थेत इथं देव होता. बिरोबावर गावकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. वर्षानुवर्षे गावकरी बिरोबाची पूजा-अर्चा करतात. ग्रामस्थांच्या भक्तीला भारुन देव साक्षात प्रकट झाला असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

बोरेगावाच्या लोकांना बिरोबांचा साक्षात्कार झाल्यानंतर पंचक्रोशीतून भाविकांनी गर्दी केली. इतर गावातील पालख्याही बिरोबाच्या मंदिरात आल्या. आणि मग गावाला जत्रेचं रुप आलं.

बिरोबा हे धनगर समाजाचं अराध्य दैवत आहे. बोरेगावचं हे मंदिर तीनशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज आहे. पण देवाचं हे असं प्रकट होणं खरं आहे की खोटं?

कुठल्या देशीं, कुठल्या वेशीं, कुठल्या रुपात ?
देवा, तुला शोधू कुठं ?
तेहतीस कोटी रुपे तुझी,
तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात
देवा, तुला शोधू कुठं ?

देऊळ चित्रपटातील हे गाणं पुरेसं बोलकं आहे...