Solapur News: कृषी मालवाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आरटीओ अधिकारी आणि पोलीस अधिकारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याची तक्रार करत सोलापूर जिल्ह्यातील आमदार अभिजीत पाटील यांनी सोलापूर डीपीडीसीच्या बैठकीत केलीये. ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई न करता कृषी मालवाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दर महिन्याला हे अधिकारी प्रत्येकी 1500 -3500 रुपये हप्ता वसूल करतात. एका शेतकऱ्याकडून तर तब्बल 26 हजारांचा दंड घेण्यात आलाय असा आरोप या बैठकीत करण्यात आला .
पालकमंत्री जयकुमार गोरेंसमोर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आरटीओ अधिकाऱ्यांचे रेट कार्डच ठेवले . पोलीस अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराचा पाढा वाचल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना सोडा अन्यथा तुमचा कार्यक्रम होईल म्हणत अधिकाऱ्यांना समज दिलीय. सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी दुपारी पार पडली .या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात अनेक आमदारांनी तक्रारी केल्या आहेत.
आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरटीओ आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या गैरकारभाराचा पाढा लोकप्रतिनिधींनी वाचलाय . शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अडवत आरटीओचे अधिकारी पैशांची मागणी करतात .वाहनधारक शेतकऱ्यांनी 1500 रुपये न दिल्यास नंबर प्लेट नसल्याचे कारण देतात वाहन फिटनेसच्या नावाखाली दंडात्मक कारवाई करतात . ई - चलान फाडून मोकळे होतात . असे आरोप या बैठकीत करण्यात आलेत . पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आरटीओ अधिकाऱ्यांचे रेट कार्ड ठेवले .आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या लुटी संदर्भात भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार केली .भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत तक्रार केली असून शहरात मोठ्या प्रमाणात डान्सबार मटका इत्यादी धंदे सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं .
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले ..
आरटीओ अधिकारी आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारींवर पालकमंत्री जयकुमार गोरे ही अधिकाऱ्यांवर भडकले .शेतकऱ्यांना अडवू नका म्हणजे अडवू नका .पुन्हा तक्रार आल्यास तुमचा कार्यक्रम होईल .तुम्ही किती नियमानुसार चालतात ते आम्हाला माहित आहे .शेतकऱ्यांना त्रास देत असाल तर याद राखा अशी तंबी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिली .
हेही वाचा: