राष्ट्रवादीच्या गाण्यावर महिला लागल्या घुमायला, केस मोकळे सोडून केला डान्स, महिला मेळाव्यात घडला प्रकार
राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या मेळाव्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी पुन्हा... या गाण्यावर महिलांच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं.

सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील वाखरी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिलांचा मेळावा होता. खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत दुपारी 2 वाजता हा मेळावा होणार होता. मात्र, अद्यापही सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी आल्या नाहीत. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला जमल्या आहेत. सुनेत्रा पवार अद्याप आल्या नसल्याने या ठिकाणी आयोजकांनी गाणी लावून मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक अनोखा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी पुन्हा... या गाण्यावर महिलांच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं.
पंढरपुरमध्ये आज राष्ट्रवादी महिलांचा मेळावा आयोजीत केला आहे. यावेळी राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर महिलांच्या अंगात आल्याचं पाहायला मिळालं. महिला मेळाव्यात अनेक महिलांनी केस मोकळे सोडून डान्स केल्याचं देखील पाहायला मिळालं. खासदार सुनेत्रा पवार यांना येण्यास उशीर असल्यानं महिलांच्या कारमणुकीसाठी गाण्यावर महिलांनी डान्स केला.
सुनेत्रा पवार यांचा दुपारी दोन चा कार्यक्रम होता. मात्र पाच वाजेपर्यंत त्या न आल्याने महिला निघून जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. यानंतर आयोजकांनी गाणी लावली. यावेळी अनेक महिलांचा डान्स सुरू केला. यावेळी काही महिलांच्या अंगात आले आणि त्या केस मोकळे सोडून नाचू लागल्या.
महत्वाच्या बातम्या:

















