Solapur :   12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे, दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. परवा म्हणजे 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आज झालेल्या मतदानावेळी काही ठिकाणी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरमध्ये मतदानावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सुरु केले बेमुदत आंदोलन सुरु केलं आहे. 

Continues below advertisement

पोलीस अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप

आज मतदानाच्या वेळी कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ वेळापूर पोलीस स्टेशन मध्ये शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस स्टेशनच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान सुरु

दरम्यान, राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज (7 फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.

Continues below advertisement

राज्य निवडणूक आयोगाने 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादित असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.