Solapur : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. बुधवारी दिनांक 12 नोव्हेंबर शिवाजी सावंत हे मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. स्वत: शिवाजी सावंत यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही सुपुत्र पृथ्वीराज सावंत आणि ऋतुराज सावंत हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत हे शिवसेनेचे भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. 

Continues below advertisement

भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, चर्चांना पूर्णविराम 

गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरुच आहे. यामध्ये आणखी भर पडली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. बुधवारी 12 नोव्हेंबरला शिवाजी सावंत हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळं आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  माझ्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवाजी सावंत यांनी एबीपी माझााशी बोलताना दिली आहे. 

शिवाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवाजी सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील मुंबईत भेट घेतली होती. तेव्हापासून शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती.मध्यंतरी भाजपमधील त्यांचा पक्ष प्रवेश रखडल्याचं देखील चर्चा सुरु होती. मात्र, अखेर बुधवारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. सावंत कुटुंबाचे साखर कारखानदारी आणि शैक्षणिक संस्थांचे मोठं जाळं आहे. तसेच बँकादेखील आहेत. त्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. 

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली

दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वीच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का दिला होता. मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर माढा तालुक्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता शिवाजी सावंत हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Solapur Politics: सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?