Solapur News : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला होता. आज सभापतीपदाच्या निवडीवेळी मोहिते पाटील यांनी मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असतानाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद देऊन भाजपला कोड्यात टाकले आहे. या निवडीमुळं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मोहिते पाटील यांनी केला आहे. 

Continues below advertisement

 18 सदस्यांपैकी भाजप सहा ठिकाणी तर विरोधी आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या

माळशिरसमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. 18 सदस्यांपैकी भाजप सहा ठिकाणी तर विरोधी आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा जिंकता आल्या असताना सभापतीपद मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या दत्ता मगर यांना देऊन मोठी खेळी केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री असल्याने पंचायत समितीच्या निधीत अडचणी येऊ नयेत यासाठी मोहिते पाटलांनी केलेली खेळी भाजपलाही अडचणीत आणणारी आहे. आज झालेल्या निवडीत शिवसेनेचे दत्ता मगर सभापतीपदी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मनीषा पाटील उपसभापतीपदी विजयी झाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर आणि आघाडीचे नेते उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात पंचायत समितीच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागेवर भाजपचे सभापती 

सोलापूर जिल्ह्यात पंचायत समितीच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागेवर भाजपचे सभापती तर एक जागी शिवसेना शिंदे गटाचा सभापती झाला आहे. माळशिरस पंचायत समिती निवडणुकीत मोहिते पाटलांची नवी खेळी केली आहे. माळशिरस तालुक्याचे सभापती पद शिवसेना शिंदे पक्षाकडे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे उपसभापती पद दिले आहे. माळशिरस पंचायत समिती निवडणुकीत बहुमत असतानाही मोहिते पाटीलांनी शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याला सभापती केले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या अधिकृत पत्रावर मात्र भाजपचे नऊ सभापती असल्याचा दावा केला आहे. मात्र सांगोला पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा सभापती असूनही भाजपने सभापती म्हणून स्वीकारलं नसल्याचे आलं समोर आलं आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, माढा, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ पंचायत समिती निवडणुकीत सभापती आणि उपसभापती भाजपचा झाला आहे. तर पंढरपूर आणि करमाळा या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती करुन सभापती पद भाजपकडे तर उपसभापती राष्ट्रवादीकडे देण्यात आले आहे. 

Continues below advertisement