(Source: Poll of Polls)
धक्कादायक! गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचा बहाना, भोंदूबाबाने केली 1 कोटी 87 लाखांची फसवणूक, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
Solapur Crime News : जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मोहम्मद कादर शेख असे फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे.
सोलापुरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकातील विजापूर येथून अटक करण्यात आली आहे.
भोंदू बाबाला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या टीमने अटक करण्याची कामगिरी केली आहे. मोहम्मद कादर शेख याने सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीतून गुप्तधन काढून देतो असे सांगत फसवणूक केली आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सापळा रचून भोंदू बाबाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:




















