Solapur Barshi Accident : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील पांगरी गावात भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या नवदम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.
बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक
बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमार यांच्यासह आणखी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
4 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते
दरम्यान, 4 दिवसांपूर्वीच लग्न झालेले अनिकेत गौतम कांबळे, मेघना अनिकेत कांबळे हे नवविवाहित तरुण-तरुणी दोघे ही गंभीर जखमी आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमी नवविवाहित दम्पत्यला बार्शीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणायत आलं आहे. मिळालेल्या प्रार्थमिक माहितीनुसार 26 नोव्हेंबर रोजी अनिकेत आणि मेघना ह्या दोघांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दोघांना घेऊन कुटुंबीय देवदर्शनसाठी तुळजापूरला निघाले होते. मात्र, अचानक कार आणि ट्रकची समोरा समोर धडक झाली आहे. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नवदम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, हा नेमका अपघात झाला कसा? याबाबतची अद्याप माहिती मिळालेली नाही.
एक्स्प्रेसमधून उतरताना तोल गेल्याने महिला ट्रेन अन् प्लॅटफॉर्मवर पडली, महिलेचा मृत्यू
दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) टॉयलेट शोधताना लंडनहून आलेल्या 66 वर्षीय 'एनआरआय' महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. एक्स्प्रेसमधून उतरताना तोल गेल्याने महिला ट्रेन अन् प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकून गंभीर जखमी झाली होती. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लंडनमध्ये राहणारे बादशाह शेख आणि त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. अंबरनाथहून लोकलने दादरमध्ये उतरलेले हे दाम्पत्य विमानतळाकडे जाण्यासाठी दुसरी लोकल पकडणार होते. मात्र, 27 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 2.23 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर शौचालय न सापडल्याने महिलेने मुलासह तिथे उभी असलेल्या मेल एक्सप्रेसच्या शौचालयाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या: