Solapur APMC Election Result: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने गुलाल उधळला आहे .एकूण 18 जागांपैकी 15 जागांवर कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने वर्चस्व दाखवल्याने आता सोलापूरच्या दोन्ही देशमुखांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठ्याच वरचढ ठरल्याची चर्चा सुरू आहे .सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज (28 April ) पार पडली .भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि प्रतिस्पर्धी भाजपचेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमध्ये सकाळपासून मोठी चुरशीची लढाई रंगली होती . (Solapur News)
18 पैकी 15 जागांवर एकहाती वर्चस्व
यंदाच्या निवडणुकीत एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते एकूण 18 जागांसाठी झालेल्या मतदानात सकाळपर्यंत आघाडीवर असलेल्या भाजप आमदार व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसलाय .18 पैकी केवळ तीन जागांवर आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय झालाय . बाकी 18 पैकी 15 जागांवर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा विजय झालाय.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील 11 पैकी 11 जागांवर कल्याणशेट्टी पॅनलचे एक हाती वर्चस्व राहिले आहे .तर ग्रामपंचायतीतील 4 पैकी 3 जागांवर सुभाष देशमुख यांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले .सोलापूर बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना फायदा झाल्याचं बोललं जात आहे .
भाजप आमदारांमध्ये चुरशीची लढत
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आता पूर्णपणे लागला आहे . या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध भाजपचेच आमदार सुभाष देशमुख यांच्या दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली .सकाळच्या सत्रात आमदार सुभाष देशमुख गटाचे उमेदवार मनीष देशमुख,रामपा चिवड शेट्टी आणि अतुल गायकवाड यांनी जोरदार मुसंडी मारत विजय संपादन केला होता.तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि कल्याण शेट्टी गटाचे उमेदवार गणेश वानकर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.मात्र आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे.सकाळपर्यंत चार पैकी तीन जागांवर विजय मिळवणारे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पॅनल पराभूत झाले आहे .तर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना 18 पैकी 15 जागांचा नेतृत्व मिळालं आहे .
हेही वाचा: