Nashik News Update  : नाशिकच्या जिंदाल कंपनीच्या (Nashik Jindal Company) दहा किलोमीटर परिसरात अद्यापही धुराचे लोट दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिंदाल पॉलिफिल्म प्रकल्पातील धुराच्या लोटाने आरोग्यास काही अपाय होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने मुंढेगावच्या दहा किलोमीटरच्या परिघातील गावांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


नववर्षाच्या सुरवातीलाच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारातील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटाने नऊ दहा किलोमीटरचा परिसर हादरला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. पुढील काही तासांत आगीने रौद्र रूप धारण केल्याने धुराचे लोळ संपूर्ण आकाशात पसरले. घटनेच्या 24 तासानंतरही धुराचे लोट दहा किलोमीटर परिसरात अद्यापही दिसत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांसाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


जिंदाल कंपनी दहा किलोमीटर परिसरातील ग्रामस्थांनी चेहऱ्याला मास्क लावावे व संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुंडे गाव शिवारातील जिंदाल पॉलिफ्लेम प्रकल्पात गेल्या रविवारी सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला तर 17 हून अधिक जण जखमी झाले. 


दरम्यान रासायनिक पदार्थांमुळे भीषण आग भडकली. जवळपास 24 तास ती धुमसत राहिल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. दुसऱ्या दिवशी आगीवर काही अंशी नियंत्रण मिळवण्यात यश आले तरी देखील आकाशात धुराचे लोट पसरले होते. धुरामुळे आसपासच्या रहिवाशांना आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात हे लक्षात घेत प्रशासनाने दहा किलोमीटरच्या परिसरात खबरदारी वाढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


इगतपुरी प्रशासनाकडून सूचना
जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आणि युक्त केमिकल मुळे विषारी वायू हवेत तयार होण्याची शक्यता गृहीत धरून जिंदाल परिसराच्या परिघातील सुमारे दहा किलोमीटर अंतरात येणाऱ्या जवळपास 25 गावांना इगतपुरी प्रशासनाने तात्काळ मास्क सक्तीचे आदेश काढले आहेत. या दुर्घटनेत अजूनही आकाशात धूर व निघत आहे. पुढील दोन दिवसात त्यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी जिंदाल परिघातील सुमारे दहा किलोमीटर अंतरात येणाऱ्या मुंढेगाव, गोंदेदुमाला, वाडीवरहे, पाडळी देशमुख, जानोरी, शेणवड खुर्द मुकणे, माणिक खांब, गरुडेश्वर दौंडत सांजेगाव, मुरंबी, कृष्णनगर आधी गावांना व परिसराला इगतपुरी महसूल प्रशासन निर्माण शक्ती तसेच अंगावर पूर्ण कपडे घालावे अशा सूचना दिल्या आहेत.