1. महाराष्ट्रात 1 मे पासून मोफत लसीकरण, मंत्री नवाब मलिकांची घोषणा; शिवसेनेकडून वृत्ताचं खंडन, विशेष समिती याबाबत घोषणा करेल, आदित्य ठाकरे यांची ट्विटद्वारे माहिती


 



  1. कोरोनाविरुद्ध लढण्यात राज्य सरकार महाखरेदी करणार; 25 हजार टन ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय, तर 10 लाख रेमडेसिवीरही मागवणार


 



  1. महाराष्ट्राच्या मदतीला गुजरात; 44 टन ऑक्सिजन गुजरातहून कळंबोलीत येणार, राजकोटहून 3 टँकर आज महाराष्ट्रात येणार


 



  1. मुंबई महापालिकेला दीड लाख लसींचा साठा प्राप्त, पालिका आयुक्तांची माहिती; आजपासून लसीकरण सुरळीत होणार


 



  1. राज्यात काल दिवसभरात 66 हजार 191 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त


 



  1. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेवर कोरोनाचं सावट; पाच मानकऱ्यांनाही कोरोनाची बाधा, फक्त 21 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा


 



  1. अमेरिका लस निर्मितीचा कच्चा माल भारताला पुरवणार, बायडन प्रशासनाची माहिती


 



  1. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक प्रकल्पात विषारी वायूगळतीचा अंदाज; ग्रामस्थांना चक्कर, डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवण्याचा त्रास, काही नागरिक रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती


 



  1. पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभेच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान; 34 जागांसाठी मतदान, ममता बॅनर्जीही आज मतदान करणार


 



  1. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा यांचं कोरोनानं निधन, 70 व्या वर्षी अखेरचा श्वास