- राष्ट्रवादी- 25
- भाजपा- 19
- काँग्रेस- 03
- शिवसंग्राम- 04
- शिवसेना- 04
- काकू-नाना आघाडी- 03
- गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
- अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांचं पद रद्द
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2017 09:37 PM (IST)
जिल्हा परिषद सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे संख्याबळ जास्त असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून वंचित रहावं लागलं होतं.
बीड/मुंबई : झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा देणाऱ्या सहा जिल्हा परिषद सदस्यांचं पद रद्द करण्यात आलं आहे. या सदस्यांना निवडणूक प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाच्या पाच आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाच्या एका सदस्याने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संख्याबळ जास्त असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून वंचित रहावं लागलं होतं. सुरेश धस यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीने निलंबनाची कारवाई केली होती. त्यांच्या गटाच्या सर्व सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र या सर्व सदस्यांचं पद रद्द केल्याने बीड जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – एकूण जागा- 60