सिंधुदुर्ग : तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच सावट असल्यामुळे साध्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातील चाकरमान्याना गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक असणार आहे. होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. 72 तासापूर्वीची कोरोना निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. तसं असेल तरच चाकरमान्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चाकरमान्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्यानंतरही गावी येण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या लोकांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधीचा निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.
Maharashtra Lockdown : राज्यात कुठे कुठे वीकेंड लॉकडाऊन? आज आणि उद्या 'या' शहरांमध्ये कडक निर्बंध
कोकणात गपणती आणि होळी हे दोन मोठे सण साजरे केले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या, रोबाट, गोमुचे नाच निघतात. शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे या शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर कोकणातील आपल्या गावी येतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात रोखण्यासाठी प्रशासनाने चाकरमान्याना येऊ नये, असं आवाहन केलं आहे. 50 लोकांच्या उपस्थितचं सन साजरे करावेत. ग्राम नियंत्रण समितीने 50 पेक्षा जास्त लोक जमणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन झाल्यास व कोरानाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्यास ते पुर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे.
Lockdown In Mira Bhayandar | मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनची घोषणा
होळीच्या काळात कोकणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र शिमगोत्सवाच्या काळात जिल्ह्याबाहेरील लोकांची तपासणी ग्राम नियंत्रण समितीकडे सोपवण्यात आली आहे. एखाद्याला कोरोनाची लक्षण असल्यास त्याला शिमगोत्सवाट सामील होता येणार नाही याची दक्षता ग्राम नियंत्रण समितीकडे सोपविण्यात आलं आहे. पालखी घरोघरी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर कोकणात येणाऱ्या गावकऱ्यांचे गावातही स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच गावात रोंबाट, नमन,खेळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.