दिलासादायक! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात तब्बल 22 हजार रुपयांची घसरण, सध्या किती आहे दर?
सोन्या चांदीच्या दरात (Silver Price) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा प्रश्न खरेदीदारांच्या समोर निर्माण होत आहे.
Silver Price News : गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात (Silver Price) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा प्रश्न खरेदीदारांच्या समोर निर्माण होत आहे. कारण वाढत्या दरामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठा झळ बसत आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारपेठेत चांदीच्या भावात दोन दिवसात 22 हजरांची घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
खामगावात धनतेरस निमित्त ग्राहकांमध्ये चांदी खरेदी करण्यासाठी उत्साह
खामगावात धनतेरस निमित्त ग्राहकांमध्ये चांदी खरेदी करण्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. कारण दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशभरात चांदीच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील बाजारपेठेत तीन दिवसात चांदीच्या भावात 22 हजार रुपयांची घसरण झाल्याने आज धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा उत्साह दिसला. गुरुवारी चांदीचे भाव 1 लाख 90 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. मात्र आज धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 22 हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी होऊन जवळपास 1 लाख 68 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत.
चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं खरेदीसाठी मोठी गर्दी
दरम्यान, चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं आज धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी चांदी खरेदी केल्याचं समोर येत आहे. वाढत्या दरामुळं अनेक ठिकाणी ग्राहकांनी चांदीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, आज दरात तब्बल 22 हजार रुपयांची घसर झाल्यामुळं चांदी खरेजीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस चांदीचे भाव वाढत असल्याने व आगामी सण आणि लग्नसराईच्या अनुषंगाने अनेकांचे बजेटही कोलमडल्याचं दिसत आहे. खामगाव येथील चांदीची बाजारपेठ ही देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे देशभरातून ग्राहक खामगाव येथे चांदी खरेदीसाठी येत असतात.
गेल्या वर्षभरात चांदीचे भाव कधी आणि किती होते (Gold Silver Rate Update)
-07 Oct - 2024 - 88 हजार रु प्रति किलो.
-1 Jan - 2025 - 99 हजार 500 रु प्रति किलो.
-1 March 2025 - 1 लाख 01 हजार रु प्रति किलो.
-1 Jun 2025 - 1लाख 10 हजार रु प्रति किलो.
-1 Sept 2025 - 1 लाख 40 हजार रु प्रति किलो.
18 oct 2025 - 1 लाख 68 हजार रुपये प्रति किलो
महत्वाच्या बातम्या:


















