सोलापूर : सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरातील पुजारी आजपासून उपोषणाला बसले आहेत. देवस्थान पंच कमिटीच्या विरोधात पुजाऱ्यांनी चक्री उपोषणाला सुरुवात केली आहे.

भाविकांनी दिलेल्या पैशाचा वाटा मिळावा, धार्मिक विधी पंच कमिटीने करू नये, जमा होणाऱ्या पैशांचा हिशोब द्यावा, पुजाऱ्यांचे कोर्टाने दिलेले अधिकार कायम ठेवावे आणि पंच कमिटीचा मनमानी कारभार बंद व्हावा, अशा या पुजाऱ्यांच्या मागण्या आहेत.

या मागण्यांसाठी पुजारी, अर्चक आणि वहिवाटदार यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. श्रावण मासाला आजपासून सुरुवात होत आहे. भाविकांना पुजारी मंडळींची व्यथा कळावी यासाठी श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.