Chief Justice Dipankar Datta: श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder Case) प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) यांनी देशभरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली.. शनिवारी पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध झाल्यानं होणाऱ्या दुष्परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधलं. हे प्रकरण म्हणजे याचंच उदाहरण आहे, असं न्यायमूर्ती दत्ता म्हणाले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे त्यांच्या भाषणात म्हणाले, नव्या युगात नवीन उपकरणे शोधली जात आहेत. 1989 मध्ये आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. दोन-तीन वर्षांनंतर आमच्याकडे पेजर होते. तेव्हा आमच्याकडे मोटोरोलाचे मोठे मोबाइल हँडसेट होते आणि आता ते लहान फोनपर्यंत कमी झाले आहेत. ज्यामध्ये कल्पना पण करता येणार नाही अशा प्रत्येक गोष्टीने सुसज्ज आहेत. तथापि, ते कोणीही हॅक करू शकतात, त्यामुळे हे आमच्या गोपनीयतेवर (Privacy)आक्रमण आहे.
भारतात एनजीटीची पाच बेंच आहेत. अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायद्यानुसार प्रादेशिक खंडपीठांच्या गरजेवर भर देताना न्यायमूर्ती दत्ता म्हणाले, "दिल्लीमध्ये एक मुख्य खंडपीठ (टीडीसॅट) असण्याऐवजी इतर सहा ठिकाणी बसण्याची परवानगी आहे का, हे आपण शोधले पाहिजे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायद्यानुसार प्रादेशिक खंडपीठे आहेत. संपूर्ण भारतात पाच एनजीटी खंडपीठे आहेत.
सरन्यायाधीश दीपंकर दत्ता म्हणाले की, ही आमच्या संस्थापकांनी निश्चित केलेली उदात्त उद्दिष्टे आहेत. ज्यांनी अतिशय काळजीपूर्वक आपली राज्यघटना तयार केली देशाचा सर्वोच्च कायदा तयार केला होता. आपण आपली राज्यघटना मोडीत काढू नये. भारतीय दूरसंचार विधेयक अस्तित्वात आहे. सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी काही मजबूत कायद्याची आवश्यकता आहे. मुंबईत प्रेम आणि दिल्लीत खून या विकृतीला इंटरनेटवर जबाबदार आहे. हे सर्व गुन्हे इंटरनेटवर सहज उपलब्ध झाल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सरन्यायाधीश दीपंकर दत्ता म्हणाले.
आफताबची नार्को टेस्ट होणार
श्रद्धा हत्याकांडात प्रकरण एक कोडे बनत चालले आहे. आरोपी आफताबकडून पोलिसांकडून सतत दिशाभूल करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी दिल्लीच्या साकेत कोर्टाकडे नार्को टेस्टची मागणी केली होती, त्याला परवानगी देण्यात आली आहे. आफताबने नार्को टेस्टच्या माध्यमातून महत्त्वाच्या गोष्टी उघड कराव्यात, जेणेकरून हत्येचे गूढ उकलता येईल, असे पोलिसांना अधिकाऱ्यांना वाटते.