गोंदिया : गोंदियामध्ये एका मनोरुग्णाला उच्च दाबाच्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं तो खांबावरुन खाली कोसळला. या घटनेत मनोरुग्ण थोडक्यात बचावला, मात्र त्याला गंभीर इजा झाली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विजेच्या धक्क्यानं मनोरुग्ण सुधारल्याचं बोललं जात आहे.


गोंदिया शहरातील नेहरु चौकात आज सकाळी 11 वाजता एक मनोरुग्ण 33 केव्हीच्या विजेच्या खांबावर चढला. मात्र उच्च दाबाच्या तारांचा स्पर्श झाल्यानं तो खाली कोसळला. बेशुद्ध झालेल्या या मनोरुग्णाला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र किरकोळ उपचारांनंतर हा रुग्ण हॉस्पिटलमधून पुन्हा पसार झाला आहे.

दरम्यान विजेच्या धक्क्यानं अनेकांचा मृत्यू होतो. मात्र गोंदियातील या मनोरुण्याची तब्येत सुधारल्याची चर्चा सध्या शहरात सुरु झाली आहे.