पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत पनवेल महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

"सर्व जागा लढण्याची तयारी सुरु करा"

पनवेल महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढण्याची तयारी सुरु करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभा

12 मे रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेने प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे, तर 21 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने प्रचाराचा समारोप केला जाणार आहे.

बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, रायगड जिल्हाप्रमुख आणि आमदार मनोहर भोईर, समन्वयक एकनाथ शिंदे उपस्थित होते.

पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कोण-कोण सभा घेणार?

  • नितीन बानगुडे-पाटील

  • डॉ. अमोल कोल्हे

  • रामदास कदम

  • संजय राऊत

  • नीलम गोऱ्हे

  • सुभाष देसाई

  • विजय शिवतारे

  • गुलाबराव पाटील

  • विजय औटी

  • हाजी अराफत शेख


याशिवाय, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील 18 ते 20 आमदार आणि नगरसेवकांची विशेष टीम बनवण्यात आली आहे. प्रत्येकाला 5 प्रभागांची जबाबदारी दिली जाईल.

एकंदरीतच शिवसेनेने पनवेल महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे.