मुंबई : शिवसेनेच्या 14 तारखेच्या जाहीर सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय. शिवसेनेच्या या सभेचा आक्रमक तिसरा टीझर प्रसिद्ध झाला आहे. तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या...दात पडायाचं काम मी करून दाखवतो असं उद्धव ठाकरेंच्या आवाजातील वाक्य यामध्ये ऐकू येतं. 14 तारखेला मी अनेकांचे मास्क काढणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. त्यातच या टीझरमुळे सभेबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
येत्या 14 तारखेला शिवसेनेची सभा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. मनात काही गोष्टी आहेत, त्या बोलणार आहे. 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरुन राजकीय वातावरण तापवलं आहे. त्यामाध्यमातून त्यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपनेही शिवसेनेवर चांगलीच टीका केली. या टीकेला उत्तर शिवेसना उत्तर देणार आहेत.
दुसऱ्या टीझरवरुन गोंधळ
शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सभेचा दुसरा टीझर पब्लिश केला होता. त्यामध्ये मनसेच्या सभेची दृश्य वापरल्याचा दावा मनसेने केला. संबंधित व्हिडीओ आणि फोटो ट्वीट करत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा दावा केला होता. मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना फोटोही चोरु लागली असा टोला गजानन काळे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मनसेच्या सभेला उत्तर देण्यासाठी येत्या 14 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. शिवसेनेने या सभेचे टीझरही पब्लिश केलं होतं. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. यामध्ये शिवाजी पार्कवरच्या राज ठाकरेंच्या सभेचे फोटो शिवसेनेच्या व्हिडीओत वापरण्यात आल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे. मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना आता फोटोही चोरु लागली असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेचा आत्मविश्वास गेलाय का? शिवसेनेला नैराश्य आलय का? असा सवाल गजानन काळे यांनी केला. शिवसेनेने नाव बदलून 'चोरसेना' नावं ठेवावं असा हल्लाबोल त्यांनी केला.