सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत (Shivajirao Sawant) यांना विधानपरिषदेवर (Legislative Assembly) घेण्याची मागणी जोर धरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव इथं युवा सेनेच्या वतीनं मेळाव्याचे आयोजन केलं होतं. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवाजीराव सावंत यांना विधानपरिषदेवर संधी देऊन आमदार करावं अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचं काम शिवाजीराव सावंत यांनी केल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. तसेच त्यांचे पुत्र आणि वाकावचे विद्यमान सरपंच ऋतुराज सावंत यांना देखील युवा सेनेचं चांगल पद मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
30 वर्षाहून अधिक काळ झालं शिवाजीराव सावंत राजकारणात सक्रिय
प्रा. शिवाजीराव सावंत हे गेल्या अनेक 30 वर्षाहून अधिक काळ झालं राजकारणात सक्रिय आहेत. 1994 साली त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली होती. 1995 साली ते प्रथम जिल्हा परिषद सदस्य झाले होते. सुरुवातीच्या काळात शिवसेना पक्षाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य झाले होते त्यामध्ये शिवाजीराव सावंत हे एक होते. त्यांचे बंधू आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे भूम परांडा वाशीचे आमदार आहेत. पण तानाजी सावंत यांच्या आधीपासून शिवाजीराव सावंत हे राजकारण सक्रिय आहेत. माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात शिवाजीराव सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्यावेळी तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माढा आणि सोलापूर जिल्ह्यात शिवाजीराव सावंत यांनी देखील शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवण्याचं काम केलं आहे. त्यामुळं त्यांना आमदारकी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साखर कारखाने, शिक्षण संस्था बँकांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार
सावंत परिवाराने साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडून ठेवण्याचं काम केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात पाच साखर कारखाने त्यांचे आहेत. तसेच अनेक मोठ्या शिक्षण संस्था देखील आहेत. तसेच जयवंत बँकेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना सेवा देण्याचं काम केलं जात आहे. या विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. माढा तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र, त्यांना तिथे अपयश आले. यावेळी देखील शिवाजीराव सावंत विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महायुतीचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळं सावंत यांना संधी मिळाली नाही. त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते काहीसे नाराज झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं.
शिवसेनेकडून विधानपरिषदेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा मिळाली होती. मात्र या जागेसाठी अनेक इच्छुक नावे पुढे आली होती. मात्र या अनेक नावात धुळे -नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
युवा विजय महाराष्ट्र दौऱ्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघात युवासेना सचिव किरण साळी, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षिरसागर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत युवकांचा भव्य मेळावा पार पडला. शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पृथ्वीराज भैय्या सावंत आणि ऋतुराज भैय्या सावंत यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या: