sanjay Gaikwad Viral Audio Clip: शिंदेसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. आता त्यांनी ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' पुस्तकावरून प्रकाशकांना अत्यंत शिवराळ भाषेत शिव्यांची लाखोली वाहिली. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोन करुन शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अनादर केल्याचे म्हणत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. संजय गायकवाड यांच्या फोनवरील शिवराळ संभाषणाची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Continues below advertisement

व्हायरल झालेला संवाद जसाच्या तसा! 

  • संजय गायकवाड: हॅलो.
  • प्रशांत आंबी: हा बोला.
  • संजय गायकवाड: हॅलो.
  • प्रशांत आंबी: हा बोला.
  • संजय गायकवाड: प्रशांत भाऊ बोलताय?
  • प्रशांत आंबी: हा बोला.
  • संजय गायकवाड: प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणावरून.
  • प्रशांत आंबी: काय बोलला?
  • संजय गायकवाड: आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा.
  • प्रशांत आंबी: हा बोला.
  • संजय गायकवाड: तुमचं एक पुस्तक आज आमच्या लग्नामध्ये काय भेटलं 'शिवाजी कोण होता' म्हणून.
  • प्रशांत आंबी: हा.
  • संजय गायकवाड: मग तुम्ही शिवाजीला... शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का?
  • प्रशांत आंबी: हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित.
  • संजय गायकवाड: नाही मला येतो तुमचा आवाज. 'शिवाजी कोण होता' तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का?
  • प्रशांत आंबी: ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि ते एकेरी नाहीये, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते.
  • संजय गायकवाड: अरे गोविंद पानसरे कोण XXXXX आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा?
  • प्रशांत आंबी: तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे.
  • संजय गायकवाड: काय माहिती घ्यायची गरज नाही मला! मला माहितीये शिवाजी महाराज कोण आहेत. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजांना एकेरी भाषेत बोलता.
  • प्रशांत आंबी: तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा तुम्ही.
  • संजय गायकवाड: काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. 'शिवाजी कोण होता' तुला लिहायची गरज काय?
  • प्रशांत आंबी: मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला समजेल.
  • संजय गायकवाड: आम्ही पुस्तक नाही, आम्ही पूर्ण इतिहास वाचलाय. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आहोत आम्ही. त्यांची आठवी पिढी माझ्या घराण्याची होती.
  • प्रशांत आंबी: मी तेच सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर, तुम्हाला कळेल.
  • संजय गायकवाड: 'शिवाजी कोण होता' हे तुला कोणी सांगितलं लिहायचं?
  • प्रशांत आंबी: 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते, आज नाही निघालेलं.
  • संजय गायकवाड: अरे काय निघालेलं? शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तू मला.
  • प्रशांत आंबी: मी तेच सांगतोय तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला.
  • संजय गायकवाड: तुला माहितीये ना पानसरेंचे काय हाल झाले?
  • प्रशांत आंबी: माहितीये मला.
  • संजय गायकवाड: मग! ब्राह्मण आहे का तू? हा? ब्राह्मण आहे?
  • प्रशांत आंबी: मी ब्राह्मण नाहीये.
  • संजय गायकवाड: मग? तुला असं कोणी लिहायला सांगितलं 'शिवाजी कोण होता' म्हणून?
  • प्रशांत आंबी: मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते.
  • संजय गायकवाड: उद्या तुझ्या आईबद्दल कोणी लिहितं, तू असं प्रसिद्ध करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितं, तू असं प्रसिद्ध करशील का? बापाबद्दल असं लिहितं, तू असं प्रसिद्ध करशील का तू?
  • प्रशांत आंबी: मी काय सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक.
  • संजय गायकवाड: अरे मला काय वाचायची गरज नाही! मी हेडलाईन वाचली की 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते' हे लिहायचं ना तू?
  • प्रशांत आंबी: हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काही तसा अनादर करणं हेतू नाही.
  • संजय गायकवाड: मग 'शिवाजी कोण होता' हे... हा काय आदर आहे का?
  • प्रशांत आंबी: अहो, 'जी' हे शिवाजी महाराजांच्या नावातलं 'जी' हे आदरार्थीच आहे. तो काही एकेरी उल्लेख नाहीये.
  • संजय गायकवाड: आं?
  • प्रशांत आंबी: 'जी' हे आदरार्थीच आहे. एकेरी उल्लेख नाहीये तो.
  • संजय गायकवाड: शिवाजी आदरार्थी आहे? तुला मी स्पष्टीकरण पाठवतो, त्याच्याबद्दलचं लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही जास्त शहाणपण शिकवू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड, तुला घरात घुसून मारीन XX  XXXXX!
  • प्रशांत आंबी: तुम्ही धमक्या देऊ नका मला.
  • संजय गायकवाड: ए... ए XXXX ! मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो. XXX नीट बोल, तुझ्या XXX XX  XXX . शिवाजी महाराज त्या XXX  XXX  होता?
  • प्रशांत आंबी: मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला.
  • संजय गायकवाड: आं? मी व्यवस्थित बोलतोय. तू शिवाजी का लिहिलंस? XXXXX ! आं? काय सांगतो तू XXXX आठव्या? तू राहतो कुठे तू हरामखोरा?
  • प्रशांत आंबी: मी कोल्हापुरात राहतो.
  • संजय गायकवाड: तुझ्या घरात घुसून मारीन तुला मी XXXXX!
  • प्रशांत आंबी: नाही, मी तेच सांगतोय व्यवस्थित मी बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला.
  • संजय गायकवाड: तू... तू तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल.
  • प्रशांत आंबी: तो अधिकार आमच्याकडे नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते.
  • संजय गायकवाड: मग त्या पानसरेला भेटायला वर जा मग! आं? पानसरेला भेटायला वर जा मग!
  • प्रशांत आंबी: नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला वाचायचे कष्ट घ्या ना!
  • संजय गायकवाड: अरे XXXखोरा, तू शिवाजी महाराज मला वाचायला काय सांगतो? रक्तात, रक्तात, कणाकणात शिवाजी महाराज आहेत. आं?
  • प्रशांत आंबी: मी तेच म्हणतोय तुम्ही वाचून घ्या पुस्तक.
  • संजय गायकवाड: उद्या तुला कोल्हापुरात उत्तर भेटेल, थांब जरा आता. सकाळी आता बोलतोय ना तुला मी, तुला उद्या सकाळी कोल्हापुरात उत्तर भेटेल, थांब जरा.
  • प्रशांत आंबी: हा, काय करणार आहात तुम्ही?
  • संजय गायकवाड: तुझी माय XX णार आहे! बरं? आणखीन काही? आं? आणखीन काही?
  • प्रशांत आंबी: आणखीन काही नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असतो असं नाही. जरा वाचायचे कष्ट घ्या ना.
  • संजय गायकवाड: नाही आणखीन सांग, आणखीन सांग काय करायचं? ए... मला पण शिव्या येतात. हा? पण आमच्यावर ते संस्कार नाहीत शिव्या द्यायचे.
  • संजय गायकवाड: अरे XXमारीच्या, जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, तेव्हा प्रत्येक माणसाचा संयम सुटतो. व्यवस्थित बोल! त्या मायेचं दूध पाजलं असेल ना तू, तू सांग फक्त कुठे राहायचं ते.
  • प्रशांत आंबी: नाही, तेच सांगतोय व्यवस्थित बोलायचं आणि...
  • संजय गायकवाड: ए... निघ त्या XXX XX XX त्या मायेचा XXX XX, त्या बायकोची XXX XX XXX XX. आणखीन काही बोलायचं तुला?
  • प्रशांत आंबी: अरे बाबा व्यवस्थित बोल! शिव्या मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या.
  • संजय गायकवाड: तू... तू देऊन बघ, तुझ्या XXX XX घालतो तिकडे येऊन मी तलवार! चल बाहेर!
  • प्रशांत आंबी: ते जरा वाचायचे की नाही कष्ट घ्या, स्वतःला आमदार म्हणवत आहे ना.
  • संजय गायकवाड: त्या मायेचा XX XX, त्या महाराजांचा अपमान करतो XXX XX तू!
  • प्रशांत आंबी: अरे बाबा व्यवस्थित बोल, मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये सांगतोय.
  • संजय गायकवाड: तू काय सांगतो रे छिनाल XXX? XXX XX औलाद XXX XX! तुम्ही आमच्या महाराजांना बदनाम करून टाकलं साल्या हरामखोरांनो! अपमान करता पदोपदी?
  • प्रशांत आंबी: तुमच्यासारख्या लोकांमुळे की नाही हे असं सगळं आहे, जरा वाचायचे जरा कष्ट घ्या.
  • संजय गायकवाड: अरे वाचताना नाव टाक ना आधी 'महाराज' टाक ना! माझा राजा टाक ना!
  • प्रशांत आंबी: हा, शिव्या दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही, जरा वाचायचे जरा कष्ट घ्या.
  • संजय गायकवाड: हो, तू नको शिकवू आम्हाला वाचायला. साल्या पुऱ्या शिवाजी महाराज सगळा इतिहास बदलून करून टाकला तुम्ही XXXXX.
  • प्रशांत आंबी: ए... तेच जरासं वाच जरा.
  • संजय गायकवाड: ए... त्या XXX XX XXX  त्या! मला नको शिकवू काय वाचायचं. हा... हा.
  • प्रशांत आंबी: हा जरा वाच जरा.
  • संजय गायकवाड: जा कुठे रिपोर्ट द्यायचा दे, कुठे पब्लिश करायचं पब्लिश कर. बरं? तुझ्या XXX XX XXX तुम्ही XXX च्या तिकडे उद्या.
  • प्रशांत आंबी: ते बघूया आपण कुठे पब्लिश करायचं वगैरे.
  • संजय गायकवाड: हा येतो उद्या. तू भेट फक्त, तुला कसा चिरडून टाकतो पायाखाली. हा... या या बघूया. आणि जरा बघ संजय गायकवाड कोण आहे माझा आमदार जरा चेक कर तू भी.
  • प्रशांत आंबी: कोण आहे?
  • संजय गायकवाड: चेक कर तू! फेसबुक कर, व्हिडिओ बघ त्याचे, युट्युब कर, मग समजेल तुला काय आहे ते.
  • प्रशांत आंबी: डॉन आहे का? मोठा?
  • संजय गायकवाड: ते तुला समजेल काय आहे ते! बरं! मग तू आमच्या महाराजांचा अपमान करतो, तू कोण त्या औरंगजेबाची औलाद आहे का?
  • प्रशांत आंबी: मी काही अपमान नाही केला ना. आता जसं तू प्रेम करतोस ना, तसं आम्ही पण शिवाजी महाराजांवर प्रेम करतोय.
  • संजय गायकवाड: मग त्या एकेरी भाषेत लिहिलं कसं मग?
  • प्रशांत आंबी: अहो तो एकेरी उल्लेख नाहीये, त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या.
  • संजय गायकवाड: 'शिवाजी कोण होता' हा उल्लेख एकेरी नाही का? आपण आईला पण आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्या.
  • संजय गायकवाड: अरे 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते' असं लिहिणं मग!
  • प्रशांत आंबी: अहो तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं असं आहे म्हणून. आत काही आक्षेपार्ह आहे का ते बघा.
  • संजय गायकवाड: आम्हाला तो विषय नाही, हेडिंग काय आहे त्यावर?
  • प्रशांत आंबी: हा मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार... ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाहीये ते.
  • संजय गायकवाड: हो, तू ठरव काय शीर्षक आणि काय नाही.
  • प्रशांत आंबी: हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय?
  • संजय गायकवाड: अरे मी पुस्तक लिहिलं का XXX  XXX ? तू लिहिलं ना! XXXX औलाद!
  • प्रशांत आंबी: ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं, लेखक पानसरे आहेत एवढं सुद्धा कळलेलं नाही.
  • संजय गायकवाड: हो तुम्ही कोणती बुद्धी... तुमची कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकेरी घेताना? आम्हाला शहाणपण शिकवू राहिला?
  • प्रशांत आंबी: हा शहाणपणा नाही शिकवत, वाचायचे जरा कष्ट घ्या.
  • संजय गायकवाड: अरे सगळं वाचलंय मी! शहाणपणा शिकवू नको मला.
  • प्रशांत आंबी: बरं किती पानाचं पुस्तक आहे?
  • संजय गायकवाड: आं?
  • प्रशांत आंबी: किती पानाचं पुस्तक आहे?
  • संजय गायकवाड: साल्या पुस्तक किती पानाचं आहे रे? 75 पानाचं पुस्तक आहे साल्या! 72 पानाचं.
  • प्रशांत आंबी: बरोबर की नाही सांग 72 पानाचं पुस्तक आहे?
  • संजय गायकवाड: हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा ते 72 पानं पुस्तकाचं हे आहे ना, तर एक तास दीड तास लागतात. ते वाचा.
  • संजय गायकवाड: ए मला काही सांगू नको टाईम किती लागतो. 'शिवाजी कोण होता' तू कसं काय लिहिलं याच्यावर?
  • प्रशांत आंबी: मी परत एकदा सांगतोय, मी लेखक नाहीये पुस्तकाचा. आणि अनादर करणं हा आमचा...
  • संजय गायकवाड: मग तू काय दलाल आहे का तू? दलाल दलाल आहे का तू पुस्तक वाटणारा? तुम्ही असेच दलाल... ए तुझ्या XXX  XXX  XX त्या मग XXX  XX त्या बायकोला, XXX  XXX  XXX  , मी नाही का...
  • प्रशांत आंबी: अरे बाबा हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय?
  • संजय गायकवाड: काय संस्कार शिकवतो रे XXX  XXX  ? तुझ्या XXX  XX XX त्या! तेच सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. तुला मी येऊन भेटणार, तुझ्या गावात भेटणार, तुझ्या घरी भेटणार, तुझी माय XXX XX थांब जरा!
  • प्रशांत आंबी: मी राजाराम झोपडपट्टीत राहतोय, मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या येतात पण मी देणार नाही. खूप चांगलं...
  • संजय गायकवाड: तू काय देशील रे? जीभ कापून टाकीन मी तुझी!
  • प्रशांत आंबी: बरं बरं बघूया की!
  • संजय गायकवाड: हा उद्या जीभ कापायला.
  • प्रशांत आंबी: येतोच मी, थांब जरा तू! हा हा या उद्या या.
  • संजय गायकवाड: थांब तुला आता रोज तुझी XX XXX  100 पोरं शोधतो मी, थांब जरा तुझा नंबर...
  • प्रशांत आंबी: बरं बरं बघूया की बघूया.
  • संजय गायकवाड: काय बघतो रे XXX ?
  • प्रशांत आंबी: बघूया बघूया.
  • संजय गायकवाड: काय बघतो त्या XXX  XX XX  त्या काय बघतो तू?
  • प्रशांत आंबी: हेच बघूया बघूया उद्या काय किती हे आहेत की नाही, उद्या बघूया आपण.
  • संजय गायकवाड: तुला हाणतो XXXX थांब जरा!

काही दिवसांपूर्वी मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मार्च 2024 मध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. जुलै 2025 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मराठा समाजात संताप व्यक्त झाला होता, ज्यावर नंतर त्यांनी माफी मागितली. 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा, पोलिसांना भ्रष्ट म्हणणे आणि मतदारांबद्दल "त्यांना फक्त दारू आणि मटण हवे असते" असे विधान करणे, अशा अनेक कारणांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या