Aaditya Thackeray: गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे गटाकडून गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला असा निरोप आला होता. पण जे गद्दार आहेत ते गद्दारच असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं. ते 50 खोके एकदम ओके असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता काकाचा दिल्लीपुढे वाका झाला आहे. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यावेळेसची भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन (majha maharashtra majha vision) या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले


देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार


देशात इंडिया आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील. देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत बसेल. तसेच महाराष्ट्रात देखील महाविका सआघाडीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र असेल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.


आदर्श घोटाळा, 70000 कोटींचा घोटाळा झाला की नाही? भाजपनं सांगावं


राज्यात आदर्श घोटाळा झाला की नाही? तसेच 70000 कोटींचा जलसिंचन घोटाळा झाला की नाही? हे भाजपनं सांगावं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आज भाजपच्या हातात सगळ्या सत्ता आहेत. त्यांनी याबाबतची चौकशी करावी, असेही ठाकरे म्हणाले. सध्या भाजप मुळ मुद्यावर चर्चा करत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, मनसेला बरोबर घेण्यात नात आडवं येत का? असा सवालही आदित्य ठाकरेंना केला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही मनसेवर कधीही वैयक्तीक टीका केलेली नाही. आमच्यासोबत ज्यांना यायचे त्यांनी यावं असे आदित्य ठाकरे म्हणाले. पक्ष एकत्र येतील का याबबात बोलताना ते म्हणाले की जर तर वर बोलण्यात काय अर्थ? असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला 


काँग्रेस सरकारच्या काळात महागाई कमी होती. आताच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला जात आहे. यावर कोणी बोलायला तयार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच देशात शेतकरी आत्महत्या होतायेत, त्यावर कोणी काही करायला तयार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


राहुल गांधी पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील? आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले...