अमरावती : आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांच्यासमोरच शिवसैनिकांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.  अमरावतीत शिवसैनिक आणि आपमध्ये हा राडा झाला.


दीपक सावंत हे सरकारी रुग्णालयाला भेट देण्यासाठी अमरावतीत आले होते.  यावेळी 'आप'चे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र आपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर घोषणाबाजी सुरु केली.

त्यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. मात्र तरीही त्यांची घोषणाबाजी सुरु होती.

यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनीही मग हस्तक्षेप केला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली.

यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा दावा करत, शिवसैनिकांनी थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.