पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरने (Shivraj Motegaonkar NEET Exam) त्यांच्या साथीदारांच्या मदतीने अत्यंत सुनियोजित कट रचल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर येत आहे. तपासानुसार, मोटेगावकर (Shivraj Motegaonkar NEET Exam) यांनी त्यांच्या क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर नियुक्ती करून घेतली होती. तसेच मनीषा मांढरेही एनटीए पॅनलवर वर्णी लावण्यात आल्याचे समोर येत आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली असा संशय तपास यंत्रणांना आहे. मोटेगावकर यांनी त्यांच्या आर्थिक ताकदीच्या बळावर हे संपूर्ण नेटवर्क उभे केल्याचा संशय सीबीआयला आहे. दरम्यान, नीट व्यवस्थापनातील आणखी कोणी या प्रकरणात सहभागी आहे का, याचाही तपास सीबीआयकडून केला जात आहे. (Shivraj Motegaonkar NEET Exam)
मोटेगावकर यांनी त्यांच्या क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर नियुक्ती करून घेतली होती. तसेच मनीषा मांढरेही एनटीए पॅनलवर वर्णी लावण्यात आल्याचे समोर येत आहे. दोघांनी आपापल्या विषयांचा म्हणजेच कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली. त्यानंतर या पेपरच्या आधारे वाढलेल्या गुणातून तो आपले कौतुक करून घेत होता. त्यातून आपल्या क्लासकडे अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षित व्हावी असं ते करत होता. (Shivraj Motegaonkar NEET Exam)
एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर त्याने या दोघांची वर्णी कशी लावली, एनटीएमध्ये त्याचं कोणाशी कनेक्शन आहे का? आणखी कोणाचं यामध्ये कनेक्शन आहे का? याचा तपास केला जात आहे, तपासात अनेक लिंक पुढे जात आहे, मोटेगावकरने आपल्या मुलाला देखील तो पेपर दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. घरात कोणीतरी डॉक्टर असावं का? अशी त्याची तयारी होती का? या अनुषंगाने तपास सुरू आहेत. सीबीआयकडून सर्व अंगाने तपास सुरू आहे.(Shivraj Motegaonkar NEET Exam)
Shivraj Motegaonkar NEET Exam: मोटेगावकरने मुलासाठी पेपर फोडला का ? तपास सुरू
स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त गुण मिळावेत, यासाठीच मोटेगावकर याने पेपरफूट केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मोटेगावकर यांचा मुलगाही बारावीमध्ये शिकत होता आणि त्याने नीट परीक्षा दिली होती. त्यामुळे मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त गुण मिळावेत, या हेतूने पेपर फोडण्यात आला का, या दृष्टीने सीबीआय तपास करत आहे.
सीबीआयने दावा केला की, मोटेगावकर हा प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि पसरवण्यात सहभागी असलेल्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य होता. आपल्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
Shivraj Motegaonkar NEET Exam: न्यायालयाने सोमवारी नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली
देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटरचे (आरसीसी) संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यात मोटेगावकर याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत सीबीआयने मोटेगावकर याच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्याला नऊ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. सीबीआयने रविवारी लातूरमध्ये मोटेगावंकर यांना अटक केली होती. मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची कथित लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
