Shivraj Divate assault case : बीडच्या परळी शहराजवळ असलेल्या टोकवाडी शिवारात शिवराज दिवटे याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी समाधान मुंडे, सचिन मुंडे, रोहन वाघुळकर, आदित्य गित्ते, तुकाराम गिरी यांना अटक करत परळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरीकडे दोन अल्पवयीन आरोपींची रवानगी निरीक्षण गृहामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रशांत कांबळे, सुरज मुंडे, रोहित मुंडे व स्वराज गित्ते हे अद्यापही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन त्याला डोंगराच्या भागात नेले आणि बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) एकच खळबळ माजली होती. मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे (Shivraj Divte) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्या प्रकारानंतर शनिवारी शिवराज दिवटे याने 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्नीने मारहाण झाल्याचे सांगितले. तसेच टोळक्यातील काहीजण, 'याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा ', असे म्हणत असल्याचेही शिवराजने सांगितले.
मी जलालपूर येथे सप्ताहाच्या जेवणासाठी गेलो होतो, जेवणानंतर तिथे काही भांडण लागले होते तिथे मी भांडण पाहायला उभा होतो. त्यानंतर शिवाजीनगरला मी मित्राला सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो, हे मारणाऱ्यांना माहिती होते.पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यावरील पोरांनी रस्ता रोखत मला मारहाण केली व मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की, 'याला सोडायचे नाही, याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा'. ते मला मारून टाकत होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. दोन माणसांनी जर मला मारताना बघितलं नसतं तर मी जिवंत राहत नव्हतो. लोखंडाची रॉड, कत्ती,लाकूड यांनी मला मारहाण केली. माझ्या डोक्यात बाटली देखील मारण्यात आली, पण ती फुटली नाही. सर्व आरोपी गांजा प्यायले होते, असे शिवराज दिवटे याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या: