Shivendraraje Bhosale : ​राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले(Shivendraraje Bhosale)  यांनी आज जालन्यातील जाफराबाद येथे आमदार नारायण कुचे आणि संतोष दानवे यांची चांगलीच फिरकी घेतली. मंत्री होण्याअगोदर मी तुमचा मित्र आहे, मात्र तुम्ही भाषणात मैत्रीचा उल्लेखच केला नाही. त्यामुळं आता तुमच्या 25 कोटींच्या निधीतून 5 कोटी कापणार, असा मिश्किल इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या आकर्षणामुळे आपण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्याचे भोसले म्हणाले. जालन्यातील जाफ्राबाद येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

Continues below advertisement

​यावेळी आमदार संतोष दानवे यांना देखील शिवेंद्रराजेंनी चिमटा काढला. 10 वर्षांत आमदार संतोष दानवेंनी मला पहिल्यांदाच मतदारसंघात बोलावलं, तेही मंत्री झाल्यावर. आता इथे आल्यावर हे हातावर पाणी घालतात की तसंच पाणी पाजून परत पाठवून देतात हे माहीत नाही, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या आकर्षणामुळे आपण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलो, असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

विचार बदलला म्हणून तुमच्यावर मरणआवकळा आली, माणसं बदलल्याने पक्ष मजबूत होणार नाही, रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना टोला