एक्स्प्लोर

साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन, मंत्री शिवेंद्रराजेंनी दिले संकेत, इच्छुक उमेदवार भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत.

Satara News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत. अशातच सातारा जिल्ह्यात देखील घडामोडींना वेग आला  आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोमिलनावर केले शिक्कामोर्तब केला आहे. भाजपच्या कमळ चिन्हावरच दोन्ही राजेंचे इच्छुक उमेदवार पालिका निवडणूक लढवणार आहेत. 

भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या

आज भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. आजच्या मुलाखतीला भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या. या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील या मुलाखतीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले आहेत. मी आणि उदयनराजे भाजपा म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.

सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार 

एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका ही निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झाल आहे. आजच्या मुलाखतीनंतर ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांची यादी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी समोर मांडणार आहे. नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्ष पद आणि, नगरसेवक पदाबाबतची यादी फायनल करतील, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मलाही नगराध्यक्ष व्हायची इच्छा होती, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य

स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार की मैत्रीपुर्ण लढत होणार याची चर्चा सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी धक्कादायक विधान केले होते. मलाही नगराध्यक्ष व्हायची इच्छा होती त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, मला नगराध्यक्ष व्हायचं आहे असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळं साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की वेगळ्या? अशी चर्चा सुरु होती. मात्र, आज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दोघांचे मनोमिलन झाल्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

शंभूराज देसाई म्हणाले युतीबाबत भाजपकडून निमंत्रण नाही, शिवेंद्रराजे म्हणाले पाटणमध्ये जे होईल तेच मेढ्यामध्ये होईल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
BMC Election: इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
इकडं राहुल नार्वेकरांच्या घरात तब्बल तिघांना भाजपची उमेदवारी अन् तिकडं थेट मुंबई भाजप उपाध्यक्षांनीच बंडाचं निशाण फडकावलं!
Embed widget