Shivaji Kon Hota Book Controversy: दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता?' (Shivaji Kon Hota) या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या पुस्तकाच्या नावावरून प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर, या वादाचा अनपेक्षित परिणाम पुस्तकाच्या विक्रीवर झाला आहे. अवघ्या चार दिवसांत या पुस्तकाच्या तब्बल 10 हजारहून अधिक प्रतींची विक्री झाली असून, सध्या बाजारात सर्व प्रती संपल्याने नव्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

Continues below advertisement

Shivaji Kon Hota Book Controversy: धमकीचा ऑडिओ व्हायरल आणि नवा वाद

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिली होती. गायकवाड यांनी फोनवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर झाल्याचा आरोप करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. "छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे गोविंद पानसरे कोण? तुझे काय झाले ते पाहिले ना? तुलाही घरात घुसून मारेन," अशा शब्दांत गायकवाड यांनी धमकी दिली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आणि राज्यभर चर्चेचा विषय ठरले.

Shivaji Kon Hota Book Controversy: वादाने वाढली वाचकांची उत्सुकता

आमदारांच्या धमकीमुळे या पुस्तकाविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. परिणामी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून या पुस्तकासाठी हजारो ऑर्डर येऊ लागल्या आहेत. गेल्या 38 वर्षांत या पुस्तकाच्या 20 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून, 24 भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत आलेली मागणी अभूतपूर्व असल्याचे प्रकाशकांनी सांगितले आहे.

Continues below advertisement

Shivaji Kon Hota Book Controversy: चार संस्थांमार्फत पुस्तकाचे प्रकाशन

1988 मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले हे 72 पानांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी आणि पुरोगामी प्रतिमा मांडते. 'लोकवाङ्मय', 'श्रमिक प्रतिष्ठान', 'समाजवादी प्रबोधिनी' आणि 'साऊ प्रकाशन' या चार संस्थांमार्फत याचे प्रकाशन केले जाते. याआधीही नावावरून वाद झाले, परंतु पानसरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यावर ते शमले होते.

आणखी वाचा 

Harshwardhan Sapkal : बुलढाणा बदनाम करण्याचा विडाच गायकवाडांनी उचललाय; कँटीनमध्ये हाणामारी, पोलिसाकडून गाडी धुणं अन् आता धमकी, हर्षवर्धन सपकाळांनी शिवसेना आमदाराचं सगळंच काढलं