Naresh Mhaske :  ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीला देवेंद्रजींनी दुजोरा दिलेला नाही. बुडायला लागलेली माणसे कोणतातरी आधार शोधतात असा टोला नरेश म्हस्के यांनी ठाकरेंना लगावला. 

Continues below advertisement

काही दिवसांनी एकनाथ शिंदेंना भेटायला येतील 

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हा इतिहास आहे. शरद पवारांवर टीका केली नंतर त्यांना भेटायला गेले. सोनिया गांधींवर टीका केली नंतर त्यांना भेटायला गेले. देवेंद्र फडणवीसांवर टीका केली नंतर त्यांची भेट घेतली. काही दिवसांनी ते एकनाथ शिंदेंना भेटायला येतील असा टोला देखील म्हस्केंनी लगावला. बुडायला लागलेली माणसे कोणतातरी आधार शोधतात असे म्हस्के म्हणाले. मिठी नदीच्या गाळात डिनो बुडाला आहे. तो डिनो यांना घेऊन बुडणार आहे. त्यामुळं हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले असतील असे म्हस्के म्हणाले.  

सगळे सोडून जात आहेत थोडी तरी पक्षाची काळजी घ्या

मी सामनाची मुलाखत वाचली. पक्ष संपायला आला आहे तरीही ही भाषा बोलताहेत.  यांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले?  मी पुन्हा येईन कोणत्या पक्षातून येईन ते माहिती नाही. सगळे सोडून जात आहेत थोडी तरी पक्षाची काळजी घ्या असे नरेश म्हस्के म्हणाले. 

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते. सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एक तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस पोहोचले. हे दोन्ही नेते साडेचार तासाहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते. सोफिटेल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय...आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या" असं म्हणत आदित्य ठाकरे निघून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. एकाच वेळी दोन्ही नेते बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis-Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झाल्याची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले, आता एक व्यक्ती गावी जाईल!