Shiv Sena Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) डावलल्यामुळं जितेंद्र जानावळे (Jitendra Janawale) यांनी  शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तिथंही त्यांना डावलण्यात आलं आहे. यानंतर जितेंद्र जानावळेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्ट करत आपली व्यक्त केली आहे. संघटन बांधणीची क्षमता असताना विभाग प्रमुख पदासाठी डावलल्याने ते नाराज झाले आहेत. आपल्यात संघटना बांधण्याची क्षमता असताना विभाग प्रमुख पदासाठी आपल्याला का नेहमी डावलले जाते, तिकडेही तसेच आणि इकडेही असेच असं जानावळेंनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement


सोशल मीडियावर पोस्ट लिहित जितेंद्र जानावळे यांच्याकडून नाराजी व्यक्त 


ठाकरेंच्या शिवसेनेत डावलले गेल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत जितेंद्र जनावळे यांनी पक्ष प्रवेश केला होता. मात्र तिथे सुद्धा विभाग प्रमुख पदासाठी त्यांची नियुक्ती होऊ शकली नाही. त्यांना डावलण्यात आले त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 


राजकीय कोंडी केल्यानं जानावळेंनी केला होता शिवसेना शिंदे गटात प्रवेश


वांद्रे येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये पक्षात अन्याय होत आहे असं सांगत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानावळे यांनी मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी पक्षात अन्याय होत असल्याचा सूर आवळला. त्यानंतर ते मातोश्रीतून बाहेर पडले आणि बंगल्याबाहेर नतमस्तक झाले. जितेंद्र जानावळे पक्षात राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्याचदिवशी त्यांनी संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब कोण आहेत? ही विधानसभा ‘आप’ला दिली होती. पण आम्ही ‘झाडू’बरोबर काम करायला विरोध दर्शवला. त्यामुळे ती जागा शिवसेनेकडे आली. भाजपाकडून ती जागा काढून शिवसेनेकडे घ्यायची होती, ही माझी इच्छा होती. पण माझी इच्छा लक्षात न घेता मला बाहेरच्या वॉर्डात टाकले. म्हणजे तुमचे मनसुबे काय आहेत? असा सवाल त्यांनी केला होता. तुम्हाला संघटना जिंकवायची आहे की भाजपा जिंकवायची आहे? असा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्यावर माझा राग नाही. विभागीय राजकारण सुरू होते, त्याला कंटाळलो होतो. माझी राजकीय कोंडी विभागात केली. एवढे मी लढलो, माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो असं जितेंद्र जानावळे यांनी म्हटलं होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. 


महत्वाच्या बातम्या:


कोकणानंतर मुंबईत तेच घडलं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा राजीनामा, स्फोटक भावनांनी भरलेलं पत्र पाठवत 'जय महाराष्ट्र'