मुंबई : "माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढलात. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सगळं करण्यात आलं, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर केला आहे.
बुलढाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी (Buldhana Shiv Sena Activists) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मशाल हाती घेत आम्ही कायमस्वरुपी तुमच्यासोबत राहू, असा विश्वास यावेळी बुलढाण्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दिला. झुकेंगे नही लडेंगे, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी मातोश्रीचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि होत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. धनुष्यबाण रामाचं होतं, त्याने रावणाला मारण्यात आलं. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे. ती पुढे घेऊन जात काम करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले आहे.
उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. लकरच मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असून आगामी काही दिवसांमध्ये मी बुलढण्यात येणार आणि सभा घेणार असल्याची माहिती देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यात येईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.
राजन साळवींचं कौतुकदरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजापूरचे आमदार राजन साळवी यांचं कौतुक केलं. "गद्दारांनी अनेक आमिषं दाखवली, पण राजन साळवी कोणत्याही अमिषाला बळी न पडता खंबीरपणे आपल्यासोबत आहेत. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली. पण त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या