Jitendra Shelke Accident Case : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) निकटवर्तीय डॉ. जितेंद्र शेळके (Jitendra Shelke) यांचा अंत झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

जितेंद्र शेळके यांना गाडी चालवताना डुलका लागल्यामुळं अपघात झाल्याचा संशय

जितेंद्र शेळके अपघात प्रकरणात शेळके हे स्वतः गाडी चालवत होते. शेजारी पत्नी आणि मुलगा मागे बसला होता. या अपघातात जितेंद्र शेळके आणि पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जितेंद्र शेळके यांना गाडी चालवताना डुलका लागला असून त्यातून हा अपघात घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक हा पळून गेला असून त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. 

कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली

जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे परतत असताना कोपरगाव-वैजापूर हद्दीत त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. या अपघातात डॉ. जितेंद्र शेळके (50), पत्नी अनुराधा जितेंद्र शेळके (45) यांचा मृत्यू झालाय. तर मुलगा सुचित जितेंद्र शेळके (14) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके (वय 50) हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित नाव होते. ते केवळ उद्योजकच नव्हते, तर 'सिल्व्हर ओक डेव्हलपर्स' या नावाने त्यांचा मोठा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. व्यवसायासोबतच त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था देखील होती, ज्या माध्यमातून त्यांनी शिर्डी आणि परिसरात आपले जाळे विणले होते.

Continues below advertisement

जितेंद्र शेळके हे अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे सदस्य होते

भोंदू अशोक खरात याच्याशी शेळके यांचे संबंध जुने होते. 2023 मध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे ते सदस्य बनले. यानंतर 2025 मध्ये ते शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले होते. अशोक खरात याच्या शिर्डीतील जमीन व्यवहार गुन्ह्यात शेळके हे महत्त्वाचे साक्षीदार होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती. 

महत्वाच्या बातम्या:

Ashok Kharat & Jitendra Shelke: अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?