Shashikant Shinde on Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जनता चालवत आहे, याला पक्षीय राजकारण देऊ नका,  सर्वपक्षीय लोक आहेत. आम्ही फक्त अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ओबीसींना कुठं दुखावलं, ओबीसी राजकारण कोणी केले? कोणी नेते उभे केले? काल परवाचे लोक अचानक मोठे होतात,  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असून त्यांनी वापर करावा आणि शोधून काढावे की हे आंदोलन कोण चालवत आहे असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.  दरम्यान, न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटील यांना अटी शर्थी घालून देण्यात आल्यानंतर आंदोलन कोणत्या ठिकाणी याची सुद्धा चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचा पर्याय सुद्धा चर्चिला जात आहे. या  पार्श्वभूमीवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, माणुसकीच्या दृष्टीने आम्ही सहकार्य करू, कालपासून ते आम्हाला भेटले आहेत. मागीलवेळी देखील पाच दिवस आम्ही मदत केली होती, हा मोर्चा नवी मुंबईत येणार नाही, पण जे लोक येतील त्यांची आम्ही व्यवस्था करू, असे त्यांनी एपीएमसी जागेवरुन सांगितलं.

Continues below advertisement


आश्वासन दिले तर ते पूर्ण करायला हवे


शिंदे समितीच्या अहवालावरून बोलताना ते म्हणाले की, शिंदे समिती झाली, समितीचा अहवाल सहा सहा महिने लांबत आहे, शिंदे इथं आले होते मागील वेळी तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते आरक्षण देऊ म्हणून. त्यानतंर किती वेळ गेला, यांनी ते पूर्ण केले नाही माझा आरोप आहे. आश्वासन दिले तर ते पूर्ण करायला हवे, जातीचे राजकारण होत आहे म्हणून विलंब होत आहे. 


तर तुम्ही एका दिवसात निर्णय घेणार का?


बावनकुळे यांच्या टीकेवरूनही शिंदे यांनी पलटवार केला. ते म्हणाले की, शरद पवार मुख्यमंत्री नाहीत, त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कुठलंही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. सरकार आल्यानंतर आरक्षण देऊ असे म्हणाले होते, आता तुम्ही कोटा वाढवा आणि आरक्षण द्या, राज्यात केंद्रात तुमचेच सरकार आहे. विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी पेक्षाच तुम्ही का करता? बाकीवेळी आम्हाला बोलवता का? आम्ही भूमिका स्पष्ट केली तर तुम्ही एका दिवसात निर्णय घेणार का? पवार साहेबांचे नाव मुद्दाम पुढे केले जाते, अशी टीका त्यांनी केली. अजितदादांच्या निधी वाटपावरून अजित पवार यांनी टीका केली. ते म्हणाले की, आता तिजोरी दादांकडे आहे पण शिस्त राहिली नाही. कोणाला किती पैसे द्यायचे हा अधिकार अजित दादांकडे राहिला नाही. काल संग्राम थोपते यांचा प्रवेश झाला, खात्याने सांगितले होते की त्यांना पैसे देऊ नका तरी दिले गेले. 


इतर महत्वाच्या बातम्या