Sharanu Hande kidnapping case Solapur : अक्कलकोट रोड इथं आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे समर्थक शरणू हांडे (Sharanu Hande) याचं पांढऱ्या रंगाच्या कारमधून येऊन चार जणांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. कारमधून उतरुन हांडे यांना हॉकी स्टिकसह अन्य शस्त्राने मारहाण केली आहे. जीवे मारण्याच्या हेतूने शरणू हांडेंना गाडीत बसवण्यात असल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, याबाबत आरोपींचे वकील अॅड शरद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एफआयआर करण्यासाठी सात तासाचा अवधी का लागला? असा सवाल अॅड शरद पाटील यांनी केला आहे.
याप्रकरणी सोलापूर न्यायालयात चार आरोपींना हजर करण्यात आलं होतं. यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात वापरलेली गाडी मालकाचे आणि यातील गुन्ह्यातील हत्यारे कोणती याची चौकशीसाठी सात दिवसाचे रिमांड मागितलं होतं. एफआयआर करण्यासाठी सात तासाचा अवधी का लागला? असा सवाल अॅड शरद पाटील यांनी केला आहे. आज न्यायालयासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे.
आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, शरणु हांडे अपहरण प्रकरणात अटक आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शरणू हांडे अपहरण प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून दोन्ही आरोपीन इंडी तालूक्यातील निंबाळ गावातून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शरणु हांडे अपहरण प्रकरणात या आधीचं चौघांना न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आता राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबुराव सुरपुरे या दोघांनाही न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोहित पवार बालिश माणूस, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका
शरणू हांडे प्रकरणात मी आरोप केले नाहीत. ज्या कार्यकर्त्याचे अपहरण केले त्याने सगळी माहिती सांगितल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. रोहित पवार बालिश माणूस आहे. मी बोलतो आणि महाराष्ट्रात वातावरण निर्मिती होते. मंत्र्यांनी बोलणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी बोलत राहावं. नेता होण्याची त्यांना घाई झाली आहे. कुठला विषय कुठे फिरवणे हे रोहित पवारांनी थांबवले पाहिजे असे पडळकर म्हणाले.
राज्यातील सरकार गेल्यामुळे रोहित पवार हतबल
ज्या भाजप नेते माऊली हळणवर यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी आरोप केले त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांचा राज्यातील सरकार गेल्यामुळे हतबल झाले आहेत. अत्यंत घाबरलेले आहेत. परवा त्यांची कुठेतरी चौकशी देखील झालेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरणु हांडे कार्यकर्त्याला भेट दिली तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाचा आला हे सांगितले आहे. मी शरणू हांडेंकडे नंतर गेलो कारण तो माझा जिवाभावाचा मित्र आहे. त्याची प्रकृती विचारण्यासाठी, खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे का? हे विचारण्यासाठी मी तिथे गेलो होतो असे माऊली हळणवर म्हणाले.
रोहित पवारचा गैरसमज झालेला आहे किंवा त्यांनी करुन घेतलेला आहे. वाळूच्या बाबतीत त्यांनी दुसरा आरोप केला. माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी मला एक एफ आय आर दाखवावी. माझ्यावर 30 ते 35 गुन्हे दाखल आहेत, त्याचा मला अभिमान आहे. त्यापैकी एकही गुन्हा माझ्यावर चोरी, दरोडा, मारामारी अशा प्रकारचा नाही. माझ्यावर शेतकरी आणि चळवळीच्या आंदोलनाचे गुन्हे आहेत. जेजुरीमध्ये पडळकर यांनी एक आंदोलन केलं होतं त्यामधला दोन नंबरचा मी आरोपी आहे. विठ्ठल मंदिर उघडा म्हणून तुमचं सरकार असताना बाळासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं, त्यामधला मी चार नंबरचा आरोपी आहे. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या चळवळीमध्ये मी अनेक वर्ष काम केलं आहे. शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत. रोहित पवार तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहात. मी चळवळीतून संघर्ष करत पुढे आलो आहे. अनेक वेळा जेलमध्ये बसत या ठिकाणी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतोय असे माऊली हळणवर म्हणाले. माझे तुम्हाला आवाहन आहे कोणतेही बेछूट आरोप तुम्ही करू नका. कारण तुम्ही घाबरलेले आहात. अनेक बहुजनांच्या नेत्यावरती तुम्ही प्रिप्लान करून बदनाम करण्याचा प्रयत्न करताय असे हळणवर म्हणाले.