मुंबई : छत्रपती शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखं (Wagh Nakh) भारतात येणार अशी घोषणा राज्य सरकारने केली. ही वाघनखं याचि देही, याची डोळा पाहता येतील, म्हणून प्रत्येकजण आनंदून गेला होता, मात्र या वाघनखांवर एक मोठा दावा केला गेला आहे. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. ज्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिलीत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही, मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, असे वक्तव्य शरद पवारांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले, इंद्रजीत सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे. इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास आहे योगदान आहे . मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये.
इंद्रजीत सावंतांचा खळबळजनक दावा
वाघनखांवरून ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. लंडनमध्ये असलेली वाघनखं ही शिवरायांची नसल्याचा दावाच सावंत यांनी केलाय.भारतात आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाहीत. लंडनच्या संग्रहालयाने पत्र पाठवून माहिती दिली. शिवरायांची वाघनखं साताऱ्यातून बाहेर गेलीच नाहीत. याविषयी उदयनराजे सांगू शकतील, असा खळबळजनक दावा इंद्रजीत सावतांनी केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्राची फसवणूक असून शिवाजी महाराजांचा अपमान : इंद्रजीत सावंत
व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने असे सांगितले असताना महाराष्ट्राचे मंत्री धादंत खोटे बोलत आहे. जी गोष्टी छत्रपती महाराजांची नाही ती गोष्ट महाराजांची आहे असे सांगत, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. 30 कोटींचा खर्च करत फक्त तीन वर्षासाठी असणार आहे.तसेच वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येत आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.
शिवरायांच्या वाघनखाचं नेमकं सत्य काय?
विधानसभेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत. पण, त्याआधीच वाघनखांवरून खळबळजनक दावे झाल्याने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोपांचे ओरखडे ओढत राहणार, मात्र शिवरायांच्या वाघनखाचं नेमकं सत्य काय? हे समोर यायलाच हवं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
Video:
हे ही वाचा :