नवी दिल्ली : भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाच्या पिकाला विरोध होत असताना 'ऊसाचं पिक कुणी टाटा-बिर्ला घेत नाही तर शेतकरीच घेतो', असं म्हणत माजी कृषीमंत्री शरद पवारांनी मात्र राज्यसभेत ऊस उत्पादकांची जोरदार पाठराखण केली.

 
राज्यसभेत दुष्काळावर चर्चा सुरु असताना उसाच्या पिकाचा विषय निघाला. त्यावेळी ऊसाचं पिक कुणी टाटा-बिर्ला घेत नाही तर शेतकरीच घेतो अशा शब्दात पवारांनी ऊसाच्या पिकाचं समर्थन केलं. तसंच ऊस जास्त पाणी पितो असं मला वाटत नाही, असंही पवार राज्यसभेत
म्हणाले.

 
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच मुद्यावर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी कृषीतज्ज्ञ नाही असा टोमणा मारत पवारांनी उत्तर देणं टाळलं होतं.

 
दरम्यान यंदाचा दुष्काळ 1971 च्या दुष्काळापेक्षाही भीषण असून त्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं आवाहन शरद पवारांनी केलं. सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिल्यानं दुष्काळसंकट ओढावल्याची कबुलीही यावेळी पवारांनी दिली.

 

संबंधित बातम्या :


दुष्काळासाठी उसाला जबाबदार धरायला मी राजेंद्र सिंह नाही : पवार