पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निकटवर्तींयावर ईडीकडून छापेमारी (ED Raid) करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या सात निकटवर्तीयांच्या घरी ईडीने छापेमारी केली, यावर शरद पवार यांनी सरकारवर घणाघात केला आहे. यावेळी पवार म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. आजची बैठक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आहे. त्यासाठी जी काही साधने वापरली जात असतील, ती आपण योग्य पद्धतीने वापरली पाहिजे. जगात काय घडतंय, देशात काय घडतंय त्याची माहितीसाठी सोशल मीडियासारखी साधन महत्वाची आहेत. राज्यकर्ते सत्तेचा वापर करून साधनाचा गैरवापर करतात. देशाच्या महत्त्वाच्या जागेवर ज्या काही व्यक्ती आहेत, त्यातील एका व्यक्तीने सत्तेचा गैरवापर केला जात आहे.'
'जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल'
शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधत पुढे म्हटलं की, ''अनिल देशमुख 14 महिने जेलमध्ये गेले होते मात्र त्यांनी सांगितले मी काही केलं नाही त्यामुळे मी तुमच्यासोबत येणार नाही. पक्षांतर केलं।म्हणजे काय केलं भाजपच्या दावणीला जाऊन बसलेत, आज भाजप जे सांगेल ते त्यांना करावं लागतंय. आमच्या बाजूने या अन्यथा आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू दुसऱ्या जागेची भीती म्हणून आपल्या सहकारी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. आज नाहीतर, उद्या अशा व्यक्तींना समाजातील लोकं त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.''
'सत्तेचा गैरवापर होतोय, त्याला आवर घालण्याची ताकद तरुणांमध्ये'
एखाद्या चॅनलवर त्यांच्याविषयी टीकेची बातमी दाखवली जात असले तर, लगेच त्या चॅनलच्या प्रमुखाला कॉल केला जातो. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा काम सध्या सत्ताधारी करत आहेत. यांना उत्तर द्यायचं असेल तर, सोशल मीडियाची यंत्रणा तयार करणे उत्तम पर्याय आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे, त्याला आवर घालण्याची ताकद तुम्हा तरुणांमध्ये आहे. हे सोशल मीडिया माध्यमातून करता येईल.
'न्यायव्यवस्था अजून जिवंत'
'तुम्हाला कुणी दमदाटी करत का? याची दखल पक्षाकडून घेतली जाणार, सत्ता असो की नसो, खटले भरले जातात. न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे. प्रत्येक जिल्ह्यात लीगल टीम तयार करून, सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर त्याला लीगल टीम मदत करेल. अलीकडे आपल्यातील काही लोकं पक्षाबाहेर गेले आहेत. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो असं त्यांच्याकडून सांगितले जाते, मात्र त्यात काही अर्थ नाही. मात्र, काही लोकांमध्ये ईडी लागली होती, त्यामुळे आपले लोक तिकडे गेलेत', असंही पवारांनी म्हटलं.
संबंधित इतर बातम्या :