Sharad Pawar NCP Lok Sabha Candidate Second List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडून लोकसभेच्या पाच उमेदवारांची यादी यापूर्वी जाहीर झाली आहे. उद्या उर्वरित पाच लोकसभा जागांची उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून केली जाणार आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघ (Raver Lok Sabha Constituency), भिवंडी लोकसभा मतदारसंघ (Bhiwandi Lok Sabha Constituency), बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha Constituency), माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) आणि सातारा या लोकसभा मतदारसंघाचा (Satara Lok Sabha Constituency) समावेश असणार आहे. उद्या जयंत पाटील पत्रकार परिषद घेऊन उर्वरित लोकसभेच्या जागांची घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. त्यामुळे उद्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उर्वरित पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहेत. त्यामुळे कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. 


बीडमधून ज्योती मेटे की बजरंग सोनवणे? 


बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून दोन नावाची जोरदार चर्चा आहे. बजरंग सोनावणे आणि विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कुणाला उमेदवारी जाहीर होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


रावेरमधून रोहिणी खडसेंना उमेदवारी?


रावेरमधून मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात रक्षा खडसे यांच्या विरोधात त्यांच्या नणंद रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रोहिणी खडसे कामाला देखील लागल्या आहेत. 


सातारा लोकसभेतून कुणाला उमेदवारी? 


सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शरद पवार गटाचे विद्यामान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


आधी गोडसे, मग भुजबळ, अन् आता दादा भुसेही तातडीने मुंबईला रवाना; नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच!